सत्या-श्रावणीची लव्हस्टोरी पाहायला मिळणार!

रितेश आणि जिनिलियाच्या वेड चित्रपटाची सगळ्यांनाच भुरळ पडली आहे.

 बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

आता रितेशचं सगळीकडेच कौतुक होत असताना रितेशने पुन्हा मोठी घोषणा केली आहे.

 'वेड' मध्ये सत्या आणि श्रावणीच शेवटी एकत्र आले असले तरी या दोघांचं एकही गाणं नाहीये.

याचाच विचार करून रितेशने वेड चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी घोषणा केली आहे.

हे गाणं खास करून सत्या आणि श्रावणीच्या लव्हस्टोरीबद्दल असणार आहे.

या गाण्यात प्रेक्षकांना पुन्हा रितेश आणि जिनिलियाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

आता सत्या आणि श्रावणीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच खुश झाले आहेत.

हे गाणं कधी रिलीज होणार हे लवकरच कळेल.