JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं...

ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं...

या अभिनेत्रीनं याची कबुली चक्क सोशल मीडियावरच देऊन टाकली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर : सेलिब्रेटी म्हटलं की कामाचा व्याप हा आलाच. अनेकदा या सेलिब्रेटींना त्यांच्या पर्सनल लाइफसाठीही वेळ मिळत नाही. तर अनेकदा त्यांनी काही आठवडे न झोपताही काढावे लागतात. पण हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण कधीच दिसत नाही. पण नुकताच एका सुपरस्टार सिंगर आणि अभिनेत्रीनं स्वतःबद्दल असा खुलसा केला आहे. जो ऐकल्यावर तुम्हीही अवाक व्हाल. या अभिनेत्रीनं सांगितलं की तिनं शेवटची अंघोळ कधी केली हेच तिला आठवत नाही. यात हैरण करणारी गोष्ट अशी की, या अभिनेत्रीनं याची कबुली चक्क सोशल मीडियावरच देऊन टाकली आहे. सुपरस्टार सिंगर आणि हॉलिवूड अभिनेत्री लेडी गागानं तिच्या ट्विटरवरुन स्वतःबद्दल असा अजब खुलासा केला आहे. ट्विटरवर पोस्ट करताना तिनं लिहिलं, माझ्या असिस्टंटनं मला विचारलं, तू शेवटची कधी अंघोळ केली आहेस. त्यावर मी तिला सांगितलं मला नाही आठवत. याचा अर्थ लेडी गागाला अंघोळ करुन एवढे दिवस झाले आहेत की तिला कधी अंघोळ केली हेच आठवत नाही. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचा हा विनोदी अंदाज युजर्सना खूप आवडला आहे. अभिनेत्री मौनी रॉयच्या सुंदर चेहऱ्याचं ‘हे’ आहे रहस्य! लेडी गागाच्या ट्विटचं तिचे चाहते खूप कौतुकही करत आहेतर दुसरीकडे लोकांना असं वाटत आहे की तिनं अलिकडे रिलीज केलेला तिचा 6 वा अल्बम याच कारणानं लवकर लॉन्च झाला. ती कामात एवढी बीझी होती की तिला स्वतःसाठी फार कमी वेळ मिळाला असेल असं तिच्या काही चाहत्यांचं म्हणणं आहे. VIDEO : माधुरीच्या ‘एक-दो-तीन…‘वर सारा अली खान जोशात थिरकते तेव्हा…

लेडी गागाबद्दल बोलायचं तर ती नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. अत्रंगी ड्रेस आणि त्यांना कॅरी करण्याचा लेडी गागाचा आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. ती एक अप्रतिम गायिका आणि कंपोजर आहे. याशिवाय तिनं अभिनय क्षेत्रातही धमाकेदार पदार्पण केलं आहे. तिनं ‘अ स्टार इज बॉर्न’ या सिनेमात काम केलं आहे. ज्यातील तिच्या भूमिकेच खूप कौतुकही झालं. अक्षयनं बायकोला दिलेल्या झुमक्यांचं पाहा काय झालं, ट्विंकलनं शेअर केला PHOTO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या