JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Singer KK dies : गायक केकेचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये निधन, बॉलिवूडवर शोककळा

Singer KK dies : गायक केकेचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये निधन, बॉलिवूडवर शोककळा

लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 31 मे : प्रसिद्ध गायक  कृष्णकुमार कुन्नथ (Singer Krishnakumar Kunnath) याच लाईव्ह कार्यक्रमात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला (Singer KK Died). त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले आहे. केके च्या मृत्यूमुळे बॉलिवूड शोककळा पसरली आहे (Singer KK Passed away). सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ याला केके म्हणून ओळखले जात होते. कोलकात्यामध्ये त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. कॉन्सर्ट सुरू असताना अचानक केके खाली कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कॉन्सर्ट सुरू असताना केकेला ह्रदयविकाराचा धक्का आला होता. त्यामुळे तो जागेवरच कोसळला होता. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. हे वाचा -  8 ब्रिझर अन् झोपेच्या गोळ्या घेऊन TV अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न; घराच दार उघडताच पोलीस हादरले! केके याने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहे. तडव तडप के, खुदा जाने, अजब सी, तूही मेरा शह है पासून देसी बाॅइज, तसं बहाने… अशा पाॅप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केकेचा आवाज होता. हिंदीशिवाय मराठी, गुजरातील, मल्याळम, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड गाण्यांनाही त्याने आपला आवाज दिला. फिल्मसाठी गाणी गाण्यापूर्वी त्याने जवळपास 35000 जिंगल्स गायले आहेत. 1999 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमसाठी त्याने ‘जोश ऑफ इंडिया’ गाणं गायलं. पल या म्युझिक अल्बममधून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. हे वाचा -  अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच देणार चाहत्यांना आश्चर्याचा धक्का ! छोट्या पडद्यावर करणार कमबॅक केकेच्या निधनामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

‘प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. के.के. यांची गाणी प्रत्येक वयोगटातील  व्यक्तींशी जोडली गेली होती. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची कायम आठवण ठेवू. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती संवेदना’, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या