JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / KK Death Updates: केकेच्या मृत्यूबाबात मोठा खुलासा! 2 हजार लोकांची कॅपिसीटी, पोहोचले 5 हजार लोक; गर्दी आवरण्यासाठी सोडला गॅस

KK Death Updates: केकेच्या मृत्यूबाबात मोठा खुलासा! 2 हजार लोकांची कॅपिसीटी, पोहोचले 5 हजार लोक; गर्दी आवरण्यासाठी सोडला गॅस

प्रसिद्ध गायक केकेच्या (KK Death) अकाली मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस केकेच्या मृत्यूची चौकशी करत असून पोस्टमर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण समोर येईल. दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जाहिरात

KK Death Updates: केकेच्या मृत्यूबाबात मोठा खुलासा! 2 हजार लोकांची कॅपिसीटी, पोहोचले 5 हजार लोक; गर्दी आवरण्यासाठी सोडला गॅस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पश्चिम बंगाल,01 जून: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केक (KK Death Updates)  याचं मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेची अकाली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली.  केकेचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. केकच्या मृत्यूप्रकरणी सातत्याने नवे खुलासे समोर येत आहेत.  एबीपी हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी कोलकत्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या केकेच्या कॉन्सर्ट हॉलची कपॅसिटी 2000-2500 लोकांची होती. परंतू तिथे 5 हजारांहून अधिक लोक दाखल झाले होते.  कॉन्सर्टमध्ये झालेली गर्दी कमी करण्यासाठी हॉलमध्ये गॅस सोडण्यात आला होता जेणेकरुन जमलेली गर्दी कमी होईल. मात्र गर्दी कमी झाली नाही. यासंदर्भातील काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचप्रमाणे असे देखील म्हटले जात आहे की, कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेली गर्दी कमी करण्यासाठी हॉलमधील एसी बंद करण्यात आली होती. त्यामुळे केकेला त्रास होऊ लागला होता. केकेचे कॉन्सर्टमधील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत देखील तो बैचेन झाल्याचं दिसून येत आहे. अनेकवेळा तो घाम पुसताना दिसतोय. बैचेनी दूर करण्यासाठी  1-2 वेळा संपूर्ण स्टेजभर फिरताना दिसतो. केकेच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस केकेच्या मृत्यूची चौकशी करत असून पोस्टमर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण समोर येईल.

केकेच्या अकाली जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. सर्व स्थरातून केकेला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.  कोलकत्ता पोलिसांनी केके ज्या हॉटेलवर थांबला होता तिथे चौकशी करण्यात सुरुवात केली आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत.  केकेच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचं पार्थिव कोलकत्ताहून स्पेशल विमानाद्वारे  मुंबईला रवाना होणार आहे. एअर इंडियाच्या AI773 हे विमान गुरुवारी सकाळी 5:15 वाजता कोलकत्ताहून निघून सकाळी 8:15 पर्यंत पार्थिव मुंबईत दाखल होणार आहे.

कोलकत्ता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत केकेला मानवंदना देण्यात आली आहे.  कोलकत्त्यात केकच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी जमा झाली आहे.  केकेला कोलकता येथे शासकीय मानवंदना देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या