मूसेवाला यांनी मानसा मतदारसंघातून पंजाबची निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा 63,323 मतांनी पराभव केला.
मुंबई, 31 मे- पंजाबी गायक आणि राजकीय व्यक्तिमत्व असणाऱ्या सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांची रविवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीआणि संगीतक्षेत्रापर्यंत सर्वच लोक हादरले आहेत. त्यांच्या हा आवडता गायक या जगात नाही यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीय. चाहते दु:खी झाले आहेत आणि ते सतत सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने सर्वच सुन्न झाले आहेत.त्यांच्या हत्येचा न्यायालयीन तपास होणार आहे. तत्पूर्वी आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. पंजाबी गायक आणि राजकारणी असलेल्या सिद्धू मूसेवाला यनाच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. याआधी त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या हत्येचा सरकारने न्यायालयीन तपास करण्याचा आदेश दिल्याशिवाय आपण अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यांनतर सरकारने त्यांची मागणी मान्य करत सिद्धू यांच्या हत्येचा न्यायालयीन तपास करण्याचा आदेश दिला आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा पाच डॉक्टरांच्या पॅनलने सिद्धू यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांचं कुटुंबीय त्यांच्यावर अंत्यदर्शन करणार आहे. मंगळवारी म्हणजेच आज त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पंजाबमधील मूसा याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. हॉस्पिटलसह गावात ठिकठिकाणी मोठा पोलीसफौजफाटा तैनात करण्यात आला आहे. **(हे वाचा:** सिद्धू मूसेवाला यांना असा साजरा करायचा होता आपला वाढदिवस, प्लॅनही होता तयार ) सिद्धू मूसेवाला यांनी गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 29 वर्षीय पंजाबी कलाकाराने मानसा मतदारसंघातून 2022 ची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा आम आदमी पार्टीचे डॉ. विजय सिंगला यांच्याकडून पराभव झाला होता.