JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sidhu Moosewala मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट! पंजाबी सिंगर अफसाना खानची NIAकडून 5 तास चौकशी

Sidhu Moosewala मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट! पंजाबी सिंगर अफसाना खानची NIAकडून 5 तास चौकशी

पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवला हत्याप्रकरणात पंजाबी सिंगर अफसानाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

जाहिरात

सिद्धू मूसेवाला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  25 ऑक्टोबर :  पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल इनवेस्टिगेशन एजेंसी म्हणजे NIAने या प्रकरणात संशयीत म्हणून पंजाबी सिंगर अफसाना खान हिला समन्स बजावून तिची तब्बल 5 तास चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका रेडमध्ये सिंगर अफसाना खान NIAच्या रडारवर आली होती. त्यानंतर मंगळवारी अफसानाला एनआयएनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले. आजच्या 5 तासांच्या चौकशीनंतर उद्या म्हणजे 26 ऑक्टोबरला देखील अफसानाची चौकशी केली जाणार आहे. आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, NIAच्या टीमनं सिद्धू मूसेवाला प्रकरणात सामील असलेल्या गँगस्टरसंदर्भात माहिती मिळवली आहे. या माहितीमध्ये सिंगर अफसाना खानचा सिद्धूच्या हत्याप्रकरणात महत्त्वाची भूमिका असू शकते असा संशय आहे. बंबीहा गँगही लॉरेंस बिश्नोई गँगचा प्रतिस्पर्धी आहे. बिश्नोई गँगवर सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बिश्नोई गँगला सिद्धू मूसेवाला हा बंबीहा गँगच्या जवळचा माणूस आहे असा संशय होता. त्यामुळेच त्यांनी सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. NIAनं या क्रिमिनल गँगस्टर नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी मकसद येथे दोन वेळा छापेमारी केली होती. हेही वाचा -  Sidhu Moosewala Passed Away: पंजाबी गाणी ते काँग्रेसमध्ये प्रवेश असा राहिला सिद्धू मूसेवाला यांचा प्रवास सिद्धू मूसेवाला भाऊ मानायची अफसाना खान संशयीत सिंगर अफसाना खान ही सिद्धू मूसेवाला याला आपला जवळचा मित्र मानत होती. त्याचप्रमाणे ती त्याला भाऊ देखील समजत होती. दोघांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. दोघांनी आजवर एकमेकांबरोबर अनेक कार्यक्रमातही काम केलं आहे. अफसाना सिद्धू मूसेवालाला पूर्णपणे ओळखत होती असं म्हटलं जात आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गोल्डी बराडचा भाऊ गुरलाल बराड याने एकदा अफसाना हिला गाण्याची ऑफर दिली होती. पण नंतर पैसे देण्यास नकार दिला होता. गोल्डी बराड आणि गुरलाल बराड यांचं बॅकग्राऊंड माहिती झाल्यानंतर अफसानानंही गाणं गाण्यास नकार दिला होता. ही गोष्ट तिनं सिद्धूला देखील सांगितली होती. 29 मे रोजी सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली. त्यानंतर राखीपौर्णिमेला अफसानानं सिद्धूला राखी बांधतानाचा थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या