JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Koffee With Karan 7: अखेर सिद्धार्थने दिली कियारासोबतच्या नात्याची कबुली;सांगितला वेडिंग प्लॅन

Koffee With Karan 7: अखेर सिद्धार्थने दिली कियारासोबतच्या नात्याची कबुली;सांगितला वेडिंग प्लॅन

बॉलिवूडमधील क्युट लव्हबर्ड्स म्हणून कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला ओळखलं जातं. हे दोघे सध्या आपल्या लव्हलाईफमुळे बरेच चर्चेत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट- बॉलिवूडमधील क्युट लव्हबर्ड्स म्हणून कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला ओळखलं जातं. हे दोघे सध्या आपल्या लव्हलाईफमुळे बरेच चर्चेत आहेत. यापूर्वी कधीही कियारा किंवा सिद्धार्थने आपल्या नात्याची कबुली दिलेली नव्हती. परंतु आता ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या नात्याबाबत कबुली दिली आहे. नुकतंच ‘कॉफी विथ करण 7’ च्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी उपस्थिती लावली आहे. या प्रोमोमध्ये करण विकी आणि सिद्धार्थला त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत काही रंजक प्रश्न विचारत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या एपिसोडची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आज रात्री हा एपिसोड प्रसारित होणार आहे. दरम्यान या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या आणि कियारा आडवाणीच्या नात्याची कबुली दिल्याचं समोर आलं आहे. वास्तविक करण विकी आणि सिद्धार्थला त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत मजेशीर प्रश्न विचारत होता. दरम्यान करणने सिद्धार्थला सांगितलं की, कियारा ज्यावेळी या शोमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा मी तिला लग्नाबाबत विचारलं. त्यावेळी तिने उत्तर देत म्हटलं मला आयुष्यात ही गोष्टदेखील करायची आहे. परंतु मी या शोमध्ये माझा प्लॅन उघड करणार नाही. करणने यावेळी सिद्धार्थला कियाराचा तो व्हिडीओसुद्धा दाखवला. सोबतच सिद्धार्थची प्रतिक्रियाही मागितली. यावर उत्तर देत सिद्धार्थने म्हटलं, ‘तुम्ही त्यांना  इतका त्रास का दिला’.

संबंधित बातम्या

**(हे वाचा:** Koffee With Karan 7: कतरिनाच्या लग्नाआधी करण-आलियाने नशेत विकीसोबत केलं होतं असं काही…ऐकून सर्वच चकित ) करण जोहरने पुढं म्हटलं, ‘मी लग्नात काय करायचं हेसुद्धा ठरवलं आहे. यावर सिद्धार्थ म्हणाला तुम्ही तयार आहात? आता आम्हालासुद्धा तयारी करु द्या. यावर विकी कौशलनेही मजेशीर रिऍक्शन दिलं आहे. त्यामुळे नकळत सिद्धार्थने आपल्या आणि कियाराच्या नात्याची कबुली दिल्याचं म्हटलं जात आहे. आज हा एपिसोड डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या