JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 500 रुपयांसाठी धडपडणारी श्वेता तिवारी आज इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती वाचून बसेल धक्का

500 रुपयांसाठी धडपडणारी श्वेता तिवारी आज इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती वाचून बसेल धक्का

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते. कायमच आपल्या ग्लॅमरने ती चाहत्यांना घायाळ करत असते. 41 व्या वर्षीही ती तेवढीच फिट आणि हॉट दिसते जशी एखादी तरुणी.

जाहिरात

श्वेता तिवारी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी  कायम चर्चेत असते. कायमच आपल्या ग्लॅमरने ती चाहत्यांना घायाळ करत असते. 41 व्या वर्षीही ती तेवढीच फिट आणि हॉट दिसते जशी एखादी तरुणी. अशातच या ग्लॅमरस अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यामुळे आज श्वेता नेहमीपेक्षा जास्त चर्चेत आहे. तिच्या खास दिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच ती एक सशक्त स्त्री देखील आहे. हे तिनं अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे श्वेता खाजगी आणि वैयक्तिक दोन्ही गोष्टीमुळे चर्चेत राहिली आहे. हेही वाचा -  Durga Puja 2022: काजोल ते राणी; दुर्गा पूजेसाठी एकत्र आले बॉलिवूड सेलेब्स, फोटो आले समोर श्वेतानं अगदी लहान वयात काम करण्यास सुरुवात केली. ती वयाच्या 12 व्या वर्षी एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची. या कामात तिला 500 रुपये मिळायचे. मात्र तिचं स्वप्न अभिनेत्री बनण्याचं असल्यानं ती यासाठी मेहनत करत राहिली आणि अखेर तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले आहे. पण या सगळ्यात तिला प्रसिद्धी छोट्या पडद्यावर मिळाली. एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने ती घराघरात प्रसिद्ध झाली.

संबंधित बातम्या

नेट वर्थबद्दल बोलायचे तर ती 81 कोटींच्या संपत्तीची मालक आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअॅलिटी शोजमधूनही पैसे कमावते. श्वेताकडे BMW 7 सीरीजची 730 LD कार आहे. या कारची किंमत सुमारे 1.38 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे Audi A4 आहे. या कारची किंमत 47.60 लाख रुपये आहे. त्याचवेळी त्यांचे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे. श्वेता तिवारी मुंबईतील कांदिवली येथील एका हायराईज अपार्टमेंटमध्ये राहते.

दरम्यान, टीव्ही सीरियल्सची आवडती सून वाढत्या वयात अधिकाधिक सुंदर होत चालली आहे. तिचा फिटनेस आणि ड्रेसिंग सेन्स चाहत्यांना आवडतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या