मुंबई , 10 जून : छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी ( Actress Shweta Tiwari) ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या अभिनयानं, सौदर्यानं, स्टाईलनं ती चाहत्यांची मनं जिंकत असते. यातच तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या मुलीनंही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही (Palak Tiwari) मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. पलकही (Palak Tiwari’s hot look) तिच्या हाॅट लूकमुळे चर्चेचा विषय ठरत असते. पलक पदार्पणाच्या पहिलेच सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता तर ती सलमान खानच्या (Salman Khan Upcoming movie) आगामी चित्रपटात झळकणार (Palak Tiwari to star in Salman Khan’s upcoming film) असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे पलकचाच बोलबाला आहे. सलमानच्या आगामी चित्रपटात अनेक नव्या कलाकारांना संधी देण्यात आली आहे यामध्ये पलकचाही समावेश आहे. हे ही वाचा - बिकिनीसोबत बांगड्या आणि कपाळावर टिकली; प्रियांका चोप्राने शेअर केला 22 वर्षांपूर्वीचा फोटो सलमान खानच्या आगामी ‘कभी ईद, कभी दिवाली’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘भाईजान’ असे करण्यात आलं आहे. या चित्रपटात पलक तिवारीची वर्णी लागल्याचं समजतंय. पलकची निवड सलमाननेच केली असून या चित्रपटात व्यंकटेश, पूजा हेगडे, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फरहाद सामजी निर्मित हा चित्रपट असणार आहे. सलमान पलकला लहानपणापासून ओळखतो. पलकनं बिग बॉस 15 मध्ये सलमानसोबत स्टेजही शेअर केला आहे. याशिवाय पलकने सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या फायनल: द फायनल ट्रुथ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पलकला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. पलकनं आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं आहे. तिच्या गाण्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे. दरम्यान, बोललं जात आहे की, गायक आणि अभिनेता जस्सी गिलसोबत शहनाज गिल दिसणार होती. मात्र त्याऐवजी आता पलक झळकणार आहे. सध्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. चित्रपटातील कलाकारांमुळे चित्रपट गाजत आहे.