JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shraddha Kapoor : 'चहा पिणाऱ्यांसाठी...'; श्रद्धा कपूरची ती पोस्ट चर्चेत , पाहा PHOTO

Shraddha Kapoor : 'चहा पिणाऱ्यांसाठी...'; श्रद्धा कपूरची ती पोस्ट चर्चेत , पाहा PHOTO

श्रद्धा कपूरनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती नो-मेकअप लुकमध्ये दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा PHOTO

जाहिरात

Shraddha kapoor

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जुलै : अभिनेत्री श्रद्धा कपूरनं (Shraddha Kapoor) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय तिचा फॅशन सेन्स देखील सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड करत असतो. श्रद्धा अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. कधी कधी ती तिचा बिना मेकअपवाला लुक देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्रामवरुन नो-मेकअप सेल्फी शेअर केला आहे. तिच्या नव्या फोटोनं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. श्रद्धा कपूरनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती नो-मेकअप लुकमध्ये दिसत आहे. शिवाय तिच्या हातात एक चहाचा कपदेखील आहे. हा सुंदर फोटो शेअर करत श्रद्धानं कॅप्शनही लक्षवेधी दिलं आहे. ‘चहा पिणाऱ्यांसाठी एक वेगळं चिअर्स असायला हवं ना?’, असा प्रश्न तिनं कॅप्शनमधून विचारला आहे. अगदी काही कालावधीतच तिचा हा सेल्फी व्हायरल झालेला पहायला मिळाला. तिच्या या नो-मेकअप फोटोचे बरेच चाहते कौतुक करत आहेत. हेही वाचा -  नॅशनल अवॉर्ड अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण; मदतीसाठी ओरडत राहिली, लोक करीत राहिले Video श्रद्धा लवकरच लव रंजनच्या अनटाइटल्ड रोमँटिक कॉमेडी-ड्रामामध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. लव फिल्म्स आणि टी-सीरीज या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याशिवाय तिचा होळी हा चित्रपट 2023 ला प्रदर्शित होणार आहे. ती दिग्दर्शक पंकज पाराशर यांच्या चालबाज इन लंडन या चित्रपटातही दिसणार आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटांसाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूरने 2013 मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत आशिकी 2 या चित्रपटात आरोहीची भूमिका साकारली तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. या चित्रपटानंतर त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली. या चित्रपटानंतर ती हैदर, साहो, एक व्हिलन, स्ट्रीट डान्सर 3डी, अब्सदी 2 यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या