मुंबई, 01 ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये करिअर करणं प्रत्येक व्यक्तीसाठी सोप्पं नाही. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या स्ट्रगलच्या काळात लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे. मागच्या काही काळापासून ‘मी टू’ चळवळीनंतर अनेकींनी यावर उघडपणे बोलायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुरवीन चावलानं तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा अनुभव सांगितला होता. सिनेमामध्ये काम देण्यासाठी कशाप्रकारे दिग्दर्शकानं तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता स्वीडनमधून आलेली आणि बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री एली अवरामनंही अशाच प्रकारचा अनुभव शेअर केला आहे. पिंकव्हिलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखातीत एलीनं तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा खुलासा केला. एली म्हणली, मी भारतीय नसल्यानं मला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक समस्या आल्या. इंडस्ट्रीमध्ये मला माझी उंची आणि लांब केसांमुळे हिणवलं गेलं होतं. मला वजन सुद्धा कमी करायला सांगण्यात आलं. मला माझ्या केसांवर खूप प्रेम होतं पण केस नाही कापलेस तर तू काकूबाई वाटशील असं मला सांगण्यात आलं. इतकंच नाही तर माझ्याकडे अप्रत्यक्षपणे शरीर सुखाची मागणी करण्यात आली ज्याबद्दल त्यावेळी मला काहीही समजलं नव्हतं. ‘मेरे बॉयफ्रेंड से गुलूगुलू करेगी तो…’ Gully Boy चा डायलॉग रेखा यांच्या आवाजात
एली पुढे म्हणाली, मी एका दिग्दर्शकाला भेटायला गेले होते. तिथून निघताना मी त्याच्याशी हात मिळवला आणि बाहेर जाऊ लागले. त्यावेळी मी निरिक्षण केलं की त्यानं हात मिळवत असताना त्याच्या बोटानं माझ्या हातावर खरवडलं होतं. मला त्यावेळी काहीच समजलं नाही. नंतर मी माझ्या एका मैत्रीणीला याविषयी विचारलं की, भारतात हात मिळवण्याचा का काय वेगळा प्रकार आहे. त्यावर तिनं विचारलं त्यानं तुझ्यासोबत असं केलं. जर असं असेल तर तो अप्रत्यक्षपणे तुझ्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. हे ऐकल्यावर मी स्तब्ध झाले. त्यानंतर मी त्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आठवू लागले ज्यांनी माझ्याशी अशाप्रकारे हात मिळवला होता. ‘तेरी मेरी…’ नंतर रानू मंडल यांचं दुर्गा पूजा साँग, तुम्ही पाहिलात का हा VIDEO
एलीनं आतापर्यंत मनीष पॉलसोबत मिक्की व्हायरसमध्ये काम केलं आहे. तसेच कपिल शर्मासोबत किस किस को प्यार करूँ या सिनेमात ती दिसली होती. The Verdict State Vs Nanavati या एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. लता दीदींची Instagram वर एंट्री, फक्त ‘या’ 5 व्यक्तींना करतात फॉलो ================================================================= VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे