मुंबई, 22 नोव्हेंबर : पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोपी असणारा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योजक (businessman) राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या जामीनावर (bail) बाहेर आहे. पॉर्नोग्राफिक फिल्मची ( films ) निर्मिती करून काही अॅपच्या माध्यमातून त्याचे प्रसारण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, पती राज कुंद्रासाठी शिल्पा शेट्टी हिने एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट पाहता या दोघांच्या नात्यामध्ये कोणताही दुरावे नसल्याचं दिसून येतंय. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. राजच्या अटकेनंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर अशाही बातम्या आल्या की शिल्पा राजवर नाराज आहे आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला आहे. मात्र, हे सर्व वृत्त चुकीचे असल्याचं सांगत शिल्पाने राजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आज शिल्पा आणि राजच्या लग्नाचा वाढदिवस (wedding anniversary ) आहे. या निमित्ताने शिल्पाने राजसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. तिने त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले की, ‘12 वर्षांपूर्वीचा हा क्षण. आम्ही एकमेकांना वचन दिलं की आम्ही चांगल्या आणि वाईट काळात एकत्र राहू. आजही आम्ही हे वचन पूर्ण करत आहोत. आमचा प्रेमावर विश्वास असून देव सुद्धा आम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतो. 12 वर्षे आणि पुढे मोजत नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… आणि आनंद, माइलस्टोन आणि आमची सर्वात मौल्यवान मालमत्ता…आमच्या मुलांसाठी..’ असे लिहितानाच शिल्पाने पुढे म्हटले आहे की, ‘त्या सर्व लोकांचे खूप खूप आभार ज्यांनी कायम चांगल्या-वाईट काळात आम्हाला साथ दिली.’ शिल्पाने या पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची सिल्कची साडी आणि दागिने घातलेले दिसत आहे. तर, राजने शिल्पाच्या आउटफिटसोबत मॅचिंग शेरवानी आणि सेहरा घातला आहे. राज कुंद्रा अटकेप्रकरणी कार्यालयातल्या एकाला अटक, पोलिसांची कारवाई दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यापासून राज प्रसिद्धीपासून दूर आहे. यासोबतच त्याने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले आहेत. काही दिवसांपासून तो त्याचे खासगी आयुष्य जगत आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा याने शिल्पासोबत हिमाचलला जाऊन तेथील अनेक मंदिरांमध्ये जात दर्शन घेतले. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात धरलेला दिसला होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तर राज तुरुंगात असताना शिल्पा त्याच्यासाठी वैष्णोदेवी येथे प्रार्थना करण्यासाठी गेली होती. काही दिवसांपूर्वी राज तुरुंगातून बाहेर आला आहे. Shilpa Shetty आणि Raj Kundra च्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोन महिने तो कोठडीत होता. सध्या तो या प्रकरणात जामीनावर बाहेर आला आहे. याकाळात शिल्पाने तिचा पती राज कुंद्रा याची साथ दिली. त्यातच आज शिल्पा हिने पोस्ट करीत, संकटाच्या काळातही आम्ही दोघे बरोबर राहू, असा संदेशच दिला आहे.