JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिल्पा शेट्टीवर आणखी एक आरोप; ‘स्पा’च्या नावाखाली केली कोट्यवधींची फसवणूक

शिल्पा शेट्टीवर आणखी एक आरोप; ‘स्पा’च्या नावाखाली केली कोट्यवधींची फसवणूक

या प्रकरणात शिल्पासोबतच तिची आई देखील अडकली आहे. त्यांना अटकही केली जाऊ शकते

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 9 ऑगस्ट**:** राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात (raj kundra pronography case) अडकलेली शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आता आणखी एका प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शिल्पा आणि तिच्या आईवर आर्थिक फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत. स्लिमिंग स्किन सलून व स्पा सुरू करण्याच्या नावाखाली तिने लखनऊमधील एका व्यवसायिका कोट्यवधींचा गंडा घातला. (cheating in land deal case) या प्रकरणी देखील आता तिची पोलीस चौकशी केली जाणार आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार शिल्पाने आयिसिस नावाची स्लिमिंग स्किन सलून व स्पा अशी एक कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या ब्रांच संपूर्ण देशात असाव्या अशी तिची इच्छा होती. अशीच एक ब्रांच लखनऊमध्ये देखील ती सुरू करणार होती. मात्र या प्रोजेक्टमध्ये तिने कोट्यवधींची फसवणूक केली असा आरोप तिच्यावर केला जात आहे. व्यवसायिक ज्योत्सना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पाविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये शिल्पाची आई सुनंदा हिचं देखील नाव घेण्यात आलं आहे. HBD: हंसिका न्यूड व्हिडीओमुळे आली चर्चेत; आज आहे लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा त्यांना हे स्पा सुरू करण्यासाठी जागा आणि इतरत्र साहित्य पुरवणार होती. परंतु तिने पैसे घेतल्यानंतरही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय त्यांच्याकडून जवळपास अडिच कोटी रूपये घेण्यात आले. या प्रकरणी तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. परंतु तिने पोलिसांना काहीच प्रतिक्रिया दिली. परिणामी आता पुन्हा एकदा तिच्याविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे. जर तिने चौकशीला नकार दिला तर तिला अटक देखील केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या