JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'असं काम करता कशाला ज्यामुळं...', राज कुंद्रा तोंड लपवल्यामुळे पुन्हा ट्रोल

'असं काम करता कशाला ज्यामुळं...', राज कुंद्रा तोंड लपवल्यामुळे पुन्हा ट्रोल

जेलमधून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रानं मीडियापासून लांब राहणं पसंद केलं. त्यासाठी राजने सोशल मीडियाला देखील रामराम ठोकला आहे. मात्र राज नेहमी कुटुंबासोत फिरताना दिसतो. मात्र प्रत्येकवेळी तो मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रासह (Raj Kundra) संपूर्ण कुटुंबाला मागील वर्ष संकाटाने भरलेले असच गेलं. राज कुंद्रालाकुंद्रा (Raj Kundra Case) पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रानं मीडियापासून लांब राहणं पसंद केलं. त्यासाठी राजने सोशल मीडियाला देखील रामराम ठोकला आहे. मात्र राज नेहमी कुटुंबासोत फिरताना दिसतो. मात्र प्रत्येकवेळी तो मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. राज कुंद्रा नुकताच मुंबईतील एका रेस्टॉरंट बाहेर स्पॉट झाला. शमिता शेट्टी (**Shamita Shetty)**आणि राकेश बापट (Raqesh Bapat) यांच्यासोबत राज कुंद्रा डिनर करण्यासाठी पोहचला होता. यावेळी पापाराझींना पाहताच राजने तोंड लपवले. मात्र जसा तो रेस्टॉरंटमध्ये गेला तसा तसं त्याने चेहऱ्यावरून हुडी बाजूला केली. मात्र तोंड लपवल्याने राज कुंद्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. वाचा- शुटिंग करताना अभिनेत्री झाली जखमी, समृद्धीला IPS ट्रेनिंग पडलं महागात! अश्लील फिल्मवरून नेटकरी राज कुंद्राच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहे. एकानं म्हटलं आहे की, असं काम करताच कशाला ज्यामुळे तोंड लपवायचे वेळ येईल. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, असं काम केलं आहे की, गर्मीत देखील हुडी घालावी लागत आहे. लोक नेमका कशासाठी यांचा आदर करतात. तर आणखी एकाने म्हटलं आहे की, किती क्लासी आहे आणि मर्यादा पाळणारा..ज्यामुळे तो आपलं तोंड देखील दाखवत नाही. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी राज कुंद्रावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या

अलीकडेच राज कुंद्रा त्याच्या कुटुंबासोबत स्पॉट झाला होता. तो आपल्या कुटुंबासह ‘द बॅटमॅन’ पाहण्यासाठी आला होता आणि येथेही तो चेहरा लपवताना दिसला. अश्लील चित्रपट प्रकरणानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने सार्वजनिक ठिकाणी येणे कमी केले आहे. अशा काही प्रसंगी राज कुंद्रा स्पॉट होतो. पण अशावेळी देखील तो पापाराझींना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या