मुंबई, 24 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Latest News) पती आणि मुलांसोबत सुट्टीसाठी बाहेर गेली आहे. दरम्यान शिल्पा तिचा फिटनेस, डान्स, ब्युटी या सर्वांमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे. तिच्या फोटोसाठी Paparazzi नेहमी उत्सुक असतात. असे असले तरी बुधवारी एअरपोर्टवर तिची ही लाइमलाइट कुणीतरी हिसकावून घेतली. शिल्पा आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी विमानतळावर निघताना दिसली, पण सर्वांच्या नजरा शिल्पा शेट्टीकडे नसून तिचा पती राज कुंद्राकडे होत्या. राज कुंद्राचा ‘एअरपोर्ट लुक’ (Raj Kundra Airport Look) असा होता की सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. राज कुंद्राच्या या लुकची तुलना नेटकरी उपाहासात्मकपणे स्पायडरमॅनशी करत आहेत. लोकं त्याला ‘सस्ता स्पायडरमॅन’ म्हणत आहे. अडल्ट फिल्म प्रकरणी (Raj Kundra Pornography Case) तुरुंगात गेल्यापासून मीडियापासून दूर राहण्यासाठी राज कुंद्राने हा मार्ग शोधला आहे. या ही आधी तोंड लपवलेल्या अवतारात राज कुंद्रा स्पॉट झाला आहे. हे वाचा- सलमानला न्यायालयाचा दणका! NRI शेजाऱ्यासोबतचा वाद पडला महागात बुधवारी राज कुंद्रा मुलगा विवानसह आणि शिल्पा शेट्टी मुलगी समिषासोबत विमानतळावर दिसली. पॅपाराझी विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शिल्पा आणि राजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात हे कुटुंब दिसत आहे. शिल्पा शेट्टी यावेळी गुलाबी आणि पांढर्या रंगाच्या टाय-एन-डाय जॉगरमध्ये दिसली तर तिच्या मुलीने देखील मॅचिंग आउटफिट कॅरी केली आहे. दरम्यान यावेळी राज कुंद्राचा लुक मात्र जास्त चर्चेचा विषय ठरला पाहा व्हिडीओ-
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, ‘एवढं काय कव्हर करायचं जेव्हा लोकांना माहित आहे की तुम्ही काय केलं आहे..’, एकाने म्हटलं आहे की, ‘चुकीचं काम केलं आहे म्हणून तोंड लपवून फिरत आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘अशी कामं का करावी की तोंड लपवावं लागेल.’ राज कुंद्राला गेल्या वर्षी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शर्लिन चोप्रा सारख्या अनेक स्टार्सनी राज कुंद्रा विरोधात साक्ष दिली होती.