JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: शिल्पा शेट्टीच्या 7 वर्षीय मुलाचं दमदार बॅक फ्लिप, स्टंट हिरोंनाही टाकलं मागे!

VIDEO: शिल्पा शेट्टीच्या 7 वर्षीय मुलाचं दमदार बॅक फ्लिप, स्टंट हिरोंनाही टाकलं मागे!

शिल्पाचा मुलगा विहाननं ज्याप्रकारे हे बॅक फ्लिप केलं आहे ते पाहता त्याची तुलना बॉलिवूडच्या स्टंट हिरोंशी केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मे : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही खास सोशल मीडियावर शेअर करत असते. कधी फिटनेस व्हिडीओ, कधी नवऱ्यासोबतचे टीकटॉक तर कधी चमचमीत पदार्थांच्या रेसीपी. नेहमीच वेगळं काहीतरी शेअर करत सरप्राइज देण्याऱ्या शिल्पानं आता तिच्या 7 वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पाचा मुलगा विहाननं ज्याप्रकारे हे बॅक फ्लिप केलं आहे ते पाहता त्याची तुलना बॉलिवूडच्या स्टंट हिरोंशी केली जात आहे. शिल्पा शेट्टीनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिचा मुलगा वियान शानदार बॅक फ्लिप करताना दिसत आहे. स्लोमोशनमध्ये असलेल्या या व्हिडीओमध्ये एवढ्या कमी वयातही वियानच्या बॅक फ्लिपमध्ये किती परफेक्शन आहे हे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसोबत शिल्पानं तिच्या मुलासाठी एक भली मोठी पोस्ट सुद्धा लिहिली आहे. विहानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. लॉकडाऊनध्ये एवढा बदलला बॉलिवूड अभिनेता, ओळखणं सुद्धा झालं कठीण

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पानं लिहिलं, मुलं त्याच गोष्टी शिकतात ज्या ती आपल्या आई-वडिलांना करताना बघत असतात. आम्हाला योगा करताना पाहून वियाननं कमी वयातच त्याच्या फिटनेसची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. लहान मुलांकडे खूप एनर्जी असते. त्यामुळे या एनर्जीचा योग्य वापर होणं खूप गरजेचं असतं. वियानला जिम्नास्टिक्स खूप आवडतं. त्यामुळे मी त्याला त्या क्लासला घातलं. पण सरावा शिवाय हे करणं खूप कठीण असतं. म्हणून आम्ही रोज त्याच्याकडून अभ्यास करुन घेतो. त्याला बीझी आणि सक्रिय ठेवतो. शिल्पानं पुढे लिहिल, जर तुमच्या मुलाला काही करायची इच्छा असेल तर त्यासाठी अभ्यासाची खूप गरज आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अभ्यास आणि सराव तुम्हाला परफेक्ट बनवतो. मुलांची भूक वाढते आणि त्यांना झोपही चांगली लागते. डेव्हिड वॉर्नरने बायको आणि मुलीबरोबर केला थेट प्रभुदेवाशी मुकाबला! पाहा VIDEO नवऱ्यानं आइस्क्रीम खाऊ दिलं नाही म्हणून त्यावर थुंकली शिल्पा शेट्टी, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या