मुंबई 9 ऑगस्ट**:** बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार तिने राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात केला होता. (Raj Kundra pronography case) तिने शिल्पा शेट्टीची बाजू घेत जसं पेराल तसंच उगवेल असा टोला राज कुंद्रावर आरोप करणाऱ्या अभिनेत्रींना मारला होता. मात्र तिच्या या प्रतिक्रियेवर अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने संताप व्यक्त केला आहे. “जर काही माहित नसेल तर उगाच प्रसिद्धीसाठी काहीही बरळू नकोस” असा इशारा तिने राखी सावंतला दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्लिनने राखीला सुनावलं. ती म्हणाली, “या प्रकरणाशी तुझा काहीही संबंध नाही. अन् असल्यास समोर येऊन काय ते खरं सांग. उगाच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही बरळू नकोस. राज कुंद्राला जर तू पाठिंबा देत आहेस तर तुझा नेमका काय संबंध आहे त्याच्यासोबत ते सांग. ज्या अभिनेत्री समोर येऊन बोलण्याचं धाडस करत आहेत, त्यांच्याबद्दल काहीही तोंडाला येईल ते बोलू नकोस.” असा इशारा शर्लिनने राखीला दिला. शिल्पा शेट्टीवर आणखी एक आरोप; ‘स्पा’च्या नावाखाली केली कोट्यवधींची फसवणूक यापूर्वी काय म्हणाली होती राखी सावंत? “तुमच्या दुकानात जर पिझ्झा मिळाला तर मी पिझ्झा खरेदी करेन. जर वडापाव मिळाला तर वडापाव खरेदी करेन. ज्या मुली भारतीय नारी होण्याचा आव आणतात त्या खऱ्या आयुष्यात तशा नसतात. त्यांची पार्श्वभूमी एकदा चेक करा मग तुम्हाला कळेल. उगाचच लोकांना आरोप करण्यात काही अर्थ तुम्ही तशा आहात म्हणूनच तुम्हाला असे रोल ऑफर केले जातात. राज कुंद्रानं मला अशा वेब सीरिजची ऑफर का दिली नाही? कारण मी फरफॉर्मर आहे. अभिनेत्री आहे. म्हणून मला अश्लील चित्रपटांच्या ऑफर मिळत नाही.”