JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shailesh Lodha : तुम्ही शेवटचे खरं कधी बोलला होतात?'; शैलेश लोढा यांनी थेट साधला असित मोदींवर निशाणा

Shailesh Lodha : तुम्ही शेवटचे खरं कधी बोलला होतात?'; शैलेश लोढा यांनी थेट साधला असित मोदींवर निशाणा

असित कुमार मोदींच्या लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये आता सचिन श्रॉफ हा अभिनेता तारक मेहतांची भूमिका साकारणार आहे.तारक मेहता येताच शैलेश यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे

जाहिरात

shailesh lodha

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 13 सप्टेंबर :  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही  मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे यात काही शंका नाही.  पण आता या मालिकेतील मधून एक एक कलाकार बाहेर पडत आहे. त्यामुळे निर्मात्यांचं चांगलचं धाबं दणाणलं होतं. मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानीने  देखील गेल्या काही वर्षांपूर्वी मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यानंतर  काही दिवसांपूर्वीच मालिकेतील लोकप्रिय तारक मेहता यांनीही मालिकेतून एक्झिट घेतली. तारक मेहता यांची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडत असल्याचं जाहीर केल्यानं प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का बसला होता. पण आता नवीन तारक मेहतांची मालिकेत एंट्री होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शैलेश लोढा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शैलेश लोढा यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय? या पोस्टच्या माध्यमातून शैलेश लोढा यांनी कोणाचेही थेट नाव न घेता  बरेच काही सांगितले आहे. अभिनेत्याने कोणाचेही नाव घेतले नसले तरी सध्याची परिस्थितीपाहता हा व्यंग कविता  कुठेतरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे निर्माते असित मोदी यांच्यावर आहे असे नेटकऱ्यांचे मत आहे… शैलेश लोढा यांनी त्यांचा हसणारा फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘‘मीच सर्वात श्रेष्ठ असावं असं ज्याला वाटतं तेच असुरक्षित आणि घाबरलेले असतात. ते लोक अजिबात प्रामाणिक नसतात जे आपला दिलेला  शब्द पाळत नाहीत. तुम्हाला दिलेला शब्द काय असतो तेच माहित नाही कारण तुमच्यातील आत्मा मेलेला आहे. तुम्हाला तरी आठवते का शेवटचे खरे तुम्ही कधी बोलला होतात?’’

संबंधित बातम्या

हेही वाचा - असित कुमार मोदींच्या लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये आता सचिन श्रॉफ हा अभिनेता  तारक मेहतांची भूमिका साकारणार आहे. अनेक दिवसांपासून तो या मालिकेत एंट्री करणार असल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता प्रोमो प्रसिद्ध करून निर्मात्यांनी याची पुष्टी केली आहे.   पण आता या पोस्टवरून शैलेश यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. या कवितेत त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी  त्यांनी या पोस्टद्वारे मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. असं चाहते म्हणतायत. हेही वाचा - Taarak Mehta Ka Ooltah Chashma : ठरलं! ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार तारक मेहता; मालिकेचा प्रोमो एकदा पहाच पण शैलेशलाच हा शो सोडायचा होता  वर्षानुवर्षे अशीच भूमिका केल्यानंतर काहीतरी नवीन शोधायचे होते. म्हणूनच त्याने ‘वाह भाई वाह’ साइन केलेअशी माहिती समोर आली होती.  तर दुसरीकडे, शैलेशने शो सोडावा असे निर्माते असित मोदींना वाटत नव्हते. तारक मेहताच्या भूमिकेत त्याला इतर कोणत्याही अभिनेत्याला आणायचे नव्हते. पण शैलेशला ते मान्य नव्हते. यामुळे चिडलेल्या असित मोदींनी ‘तो आला नाही तर शो थांबणार नाही’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या