JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ...आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख थेट पोहोचला तुरुंगात!

...आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख थेट पोहोचला तुरुंगात!

शाहरुखनं असं नक्की केलं तरी काय की त्याला शूटिंग सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 नोव्हेंबर : बॉलिवूडचा किंग म्हणजे शाहरुख खान त्याच्या अभिनयासोबतच मीडियासोबत चांगला व्यवहार करण्यासाठी ओळखला जातो. पण काही वर्षांपूर्वी असं झालं होतं की एका संपादकांवर शाहरुख खूप रागवला होता आणि यामुळे त्याला खूप तुरुंगातही जावं लागलं होतं. नुकतंच नेटफ्लिक्सवर प्रसारित केल्या जाणाऱ्या अमेरिकन होस्ट डेव्हिड लेटरमॅन यांच्या चॅट शोमध्ये शाहरुखनं याचा खुलासा केला. याशिवाय यावेळी त्यानं त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील कठीण दिवसांबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शाहरुखचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. आपल्या अभिनयानं शाहरुखनं असंख्य लोकांची मनं जिंकली आहेत. पण सर्वांच्या लाडक्या शाहरुखनं एक असा कारनामा केला होता की, त्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागली होती. शाहरुखनं डेव्हिड लेटरमॅन यांच्याशी बोलताना सांगितलं, करिअरच्या सुरुवातीला एका मासिकात त्याच्याबद्दल एक आर्टिकल छापण्यात आलं होतं. त्यामध्ये असं काही लिहिलं गेलं होतं जे सहन करण्यापलिकडे होतं. बॉलिवूडमध्ये येण्याआधी ‘गे’ व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती ‘ही’ अभिनेत्री या आर्टिकलबद्दल शाहरुखला समजल्यावर त्यानं त्या मासिकाच्या संपादकांना याविषयी विचारायला गेला. यावर त्या संपादकांनी म्हटलं की, तुम्ही हे एवढं मनावर घेऊ नका ही फक्त मस्करी होती. पण शाहरुखला संपादकांची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. तो रागाच्या भरात उद्धटपणे त्यांना वाटेल ते बोलला आणि तिथून निघून गेला. ‘…तर देशात हुकूमशाही लागू करा’, महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पोंक्षे संतापले शाहरुख पुढे म्हणाला, त्यानंतर एक दिवस मी एका सिनेमाचं शूट करत होतो. काही पोलिस ऑफिसर्स त्या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हटलं की त्यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर मी सरळ जेलमध्ये होतो. ती जागा खूपच वाईट होती आणि लहान सुद्धा. तसेच तिथे बरेच वाईट लोक होते. …जेव्हा सलमानच्या शाळेत वडील सलीम खान यांना झाली होती शिक्षा! शाहरुखनं सांगितलं, सुरवातीच्या दिवसात स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहिल्यावर मला अजिबात आवडत नसे. पण मला आनंद वाटतो की लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं. मला पसंत केलं. =====================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या