John Abraham in Pathaan
मुंबई, 25 ऑगस्ट : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या बहुप्रतीक्षित ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यामुळे या चित्रपटांचीही सध्या प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा फर्स्ट लूक समोर आला तेव्हापासून शाहरुखला परत एकदा ऍक्शन मोडमध्ये बघण्यत्साठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पण आता या चित्रपटात भूमिका साकारणारा महत्वाचा अभिनेता जॉन अब्राहमचा फर्स्ट लुक समोर आला आहे. शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे जॉन अब्राहमचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. ते पोस्टर बघून चाहत्यांच्या चित्रपटाकडून अपेक्षा दुणावल्या आहेत. ‘पठाण’ च्या या मोशन पोस्टरमध्ये जॉन अब्राहमच्या या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असेल असं सध्यातरी वाटत आहे. या पोस्टरमध्ये जॉन हातात बंदुका घेऊन उभा आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना शाहरुख खानने लिहिले आहे की, ‘He’s tough and plays it rough!’. पठाण हा जॉनचा शाहरुखसोबतचा पहिला चित्रपट आहे. त्याची या चित्रपटातील नेमकी भूमिका काय असेल हे जरी गुलदस्त्यात असले तरी तो या चित्रपटात शह्ररूखचा विरोधक असेल हे स्पष्ट झाले आहे.
शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करण्याच्या अनुभवाबद्दल जॉनने एका मुलाखतीत सांगितले होते कि, ‘मी शाहरुख सोबत काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळात मी एका मॉडेलिंग शो मध्ये सहभागी म्हणून होतो तेव्हा शाहरुख त्या शोचा जज होता. आणि आज त्याच्यासोबतच मला काम करायला मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो.’ जॉन अब्राहम अलीकडे अर्जुन कपूरसोबत ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटात झळकला होता. पण त्याच्या या चित्रपटाने काही विशेष कामगिरी केली नव्हती. त्यामुळे जॉनचे चाहते पठाण चित्रपटाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. हेही वाचा - Mazhi tuzhi reshimgath : ‘मालिकेमुळे माझं आयुष्यच बदललं’; असं का म्हणाला श्रेयस तळपदे? सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे आमिर खान, अक्षय कुमार या बड्या स्टार्सचे चित्रपट फ्लॉप ठरत असताना शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉलिवूडला तारेल अशी आशा आहे. या चित्रपटात शाहरुख आणि जॉन अब्राहमसोबत दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. तसेच सलमान खानची देखील छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे. केवळ शाहरुखच नाही तर यशराज फिल्म्सही त्यांचे नशीब फिरवण्यासाठी पठाणवर अवलंबून आहेत. स्टुडिओने यावर्षी रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार, अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज आणि रणबीर कपूरचा शमशेरा यासह हाय-प्रोफाइल चित्रपट अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून सगळ्यांनाच प्रचंड अपेक्षा आहेत.