JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सैफ अली खानच्या समोरच करीना-शाहिदचा आमनासामना,अशी झाली दोघांची अवस्था, Video Viral

सैफ अली खानच्या समोरच करीना-शाहिदचा आमनासामना,अशी झाली दोघांची अवस्था, Video Viral

Bollywood Ex Couple Shahid Kapoor Kareena Kapoor Viral Video: बॉलिवूडमध्ये सतत अफेयर्स आणि ब्रेकअप्सचे किस्से ऐकायला मिळत असतात. परंतु काही जोड्या अशा आहेत ज्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाच नव्हे तर सेलिब्रेटींनासुद्धा धक्का बसला होता. त्यातीलच एक जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूर होय.

जाहिरात

सैफ अली खानच्या समोरच करीना-शाहिदचा आमनासामना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मे- बॉलिवूडमध्ये सतत अफेयर्स आणि ब्रेकअप्सचे किस्से ऐकायला मिळत असतात. परंतु काही जोड्या अशा आहेत ज्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांनाच नव्हे तर सेलिब्रेटींनासुद्धा धक्का बसला होता. त्यातीलच एक जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि करीना कपूर होय. या दोघांची जोडी इतकी पसंत केली जात होती की, सर्वजण या दोघांच्या लग्नाची अपेक्षा करत होते. मात्र अचानक रिलेशनशिपच्या एका टप्प्यावर येत या दोघांनी एकेमकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतरसुद्धा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. त्यांनतर या दोघांनी आपापल्या आयुष्यात पुढे जात आपला संसार थाटला आहे. परंतु फारच कमीवेळा हे दोघे एकमेकांच्या समोर येतात. परंतु जेव्हा येतात तेव्हा अशी अवस्था होते. शाहिद आणि करीना कपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. करीना कपूर आणि शाहिद कपूर ब्रेकअपनंतर क्वचितच एकमेकांच्या समोर आले आहेत. नुकतंच सोशल मीडियावर शाहिद आणि करीनाचा एक व्हिडीओ व्हायरलं होतं आहे. ज्यामध्ये सैफसुद्धा दिसून येत आहे. हा व्हिडीओ खरं जुना आहे. जो आता नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका आयफा अवॉर्ड्सदरम्यान सैफसमोर करीना आणि शाहिदची एक विचित्र भेट झाली होती आणि त्यांच्यादरम्यान झालेल्या संवादाचा जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे वाचा: नेमकी कोण आहे The Kerala Story फेम अदा शर्मा? अभिनेत्रीची संपत्ती जाणून व्हाल थक्क ) रेडइटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर आणि फरहान अख्तर अवॉर्ड शो होस्ट करताना दिसत आहेत. दरम्यान शाहिदने करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांना पुरस्कार देण्यासाठी स्टेजवर बोलावले. दोघांमध्ये थोडा वेळ संवादही झाला. स्टेजवर येताना करिनाने दोन्ही होस्टना शुभेच्छादेखील दिल्या. तसेच तिने चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं. व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहलंय की, ‘शाहिदने त्यांचे आभार मानले तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिलेही नाही. दुसर्‍याने लिहलंय, “शाहिद नेहमीच विक्षिप्त वागतो. ‘उडता पंजाब’च्या प्रमोशन कार्यक्रमातही त्याने असंच केलं होतं. तो तिच्याकडे कधीही पाहू शकत नाही, जरी ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तरी. ”अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Awkward interaction between Shahid and Kareena. by u/sepiosexual in BollyBlindsNGossip

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची जोडी प्रचंड लोकप्रिय होती. लोकांना या दोघांना ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन एकत्र पाहायला आवडायचं. परंतु या दोघांच्या ब्रेकअपने सर्वानांच धक्का बसला होता. शाहिद कपूरने करीनासोबत ब्रेकअपनंतर काही काळाने मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली होती. या दोघांनाही लोकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. शाहिद आणि मीराला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

तर दुसरीकडे करीना कपूरने शाहिदसोबत ब्रेकअपनंतर अभिनेता सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची लव्हस्टोरी ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर सुरु झाली होती. या दोघांना दोन मुले आहेत. सैफ अली खानचं हे दुसरं लग्न आहे. याआधी सैफने अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या