JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / करिनासोबतच्या किसिंग प्रकरणावर 20 वर्षांनी शाहिदचा मोठा खुलासा; म्हणाला 'मी उद्ध्वस्त झालो...'

करिनासोबतच्या किसिंग प्रकरणावर 20 वर्षांनी शाहिदचा मोठा खुलासा; म्हणाला 'मी उद्ध्वस्त झालो...'

शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या नात्याची सगळ्यात जास्त चर्चा रंगली होती. हे दोघे एकमेकांच्या चांगलेच प्रेमात होते. अशातच दोघांचा एक किसिंग व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आता एवढ्या वर्षांनी शाहिदने त्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

जाहिरात

शाहिद आणि करीना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै : शाहिद कपूर आज एक नावाजलेला अभिनेता आहे. एवढ्या वर्षात शाहिदने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॅकस्टेज डान्सर म्हणून इंडस्ट्रीत सुरुवात केलेला शाहिद आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूड मध्ये प्रगती करताना शाहिदचं वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिलं. शाहिद अनेक अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता. पण त्याच्या करीना कपूर सोबतच्या नात्याची सगळ्यात जास्त चर्चा रंगली होती. हे दोघे एकमेकांच्या चांगलेच प्रेमात होते. अशातच दोघांचा एक किसिंग व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आता एवढ्या वर्षांनी शाहिदने त्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. 2004 मध्ये शाहिद कपूर आणि त्याची तत्कालीन गर्लफ्रेंड करीना कपूर मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये किस करताना दिसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रात हा फोटो प्रसिद्ध झाला आणि देशभरात हे दोघे चर्चेचा विषय ठरले. पण तेव्हा शाहिद करिनासोबत व्हिडिओमधला मुलगा तो नाही असं म्हणत ती घटना नाकारत राहिला. पण आता एवढ्या वर्षांनंतर शाहिद कपूरने अखेर त्याबद्दल आपले मौन सोडलं आहे. 24 वर्षांच्या शाहिदवर या घटनेचा किती परिणाम झाला होता हे त्याने उघड केले आहे.

‘मिड डे’शी संवाद साधताना शाहिद कपूर म्हणाला की, ‘मी त्यावेळी उद्ध्वस्त झालो होतो. मी फक्त 24 वर्षांचा होतो आणि मला वाटले की माझ्या प्रायव्हसीवर आक्रमण झालं आहे आणि मी त्याचे संरक्षण करण्यासाठी काहीही करू शकत नाही. माझ्या आयुष्यात काय झालंय आणि काय होतंय मला काहीच समजत नव्हतं. याचा तुमच्यावर खूप चुकीचा परिणाम होतो.’ तो पुढे म्हणाला की, विशेषत: त्या वयात, जेव्हा एखाद्याला त्यांच्या भावना समजू लागतात आणि तुम्ही कोणाला डेट करता, नेमकं त्याच वेळी माझ्यासोबत तेव्हा या गोष्टी घडल्या.’ असं मत त्याने व्यक्त केला आहे. ‘देशाचे नेते अशिक्षित…’ त्या वक्तव्यामुळे ट्रोल होताच काजोलचं स्पष्टीकरण; म्हणाली ‘माझा तसा हेतू नव्हता…’ तो व्हिडीओ कसा व्हायरल झाला याची शाहिद आणि करीनाला काहीच कल्पना नव्हती. पण एकदा शाहिदला सांगण्यात आले की, ‘आमच्या स्टुडिओमध्ये दोन मुले आली आणि त्यांनी सांगितले की जर तुम्ही 500 रुपये दिले तर आम्ही तुम्हाला शाहीद आणि करीनाचा क्लबमध्ये किस करतानाचा फोटो देऊ.’ अशा प्रकारे दोघांचा व्हिडीओ रातोरात प्रसिद्ध झाला होता. शाहिद कपूर आणि करीना कपूर 2007 मध्ये वेगळे झाले. शाहिद आता मीरा राजपूतसोबत आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहे आणि त्यांनी 7 जुलै रोजी ग्रीसमध्ये लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, करिनाने सैफ अली खानशी लग्न केले आहे आणि दोघेही त्यांच्या दोन मुलांसह तैमूर आणि जेहसह सार्डिनियामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या