मुंबई, 10 मे- काही वर्षांपूर्वी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि बादशहा शाहरुख खानच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. पण, या चर्चा वाढण्याआधीच दोघांचे मार्ग वेगळे झाले. असं असलं तरी सोशल मीडियाच्या मायाजाळात सर्वकाही कोणाचं अफेअर लपून राहत नाही. या सगळ्यात सध्या शाहरुख आणि प्रियांकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात शाहरुख प्रियांकासोबत लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ आताचा नसून 2000 मधील ‘फेमिना मिस इंडिया’चा आहे. याचवर्षी प्रियांकाने ‘मिस इंडिया’साठी सहभाग घेतला होता. तर या शोची होस्ट मलायका अरोरा होती. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख या शोचा परीक्षक होता, यामुळेच त्याने प्रियांकाला लग्नाशी निगडीत प्रश्न विचारले. ‘तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि…’, कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण व्यासपीठावर उभ्या असलेल्या प्रियांका शाहरुखने विचारलं की, ‘तुला अजहरसारख्या क्रिकेटरशी लग्न करायला आवडेल की, स्वारोवस्कीसारख्या मोठ्या कंपनीच्या मालकाशी लग्न करायला आवडेल. तसेच तिसरा पर्याय म्हणजे माझ्यासारख्या हँडसम सुपरस्टारशी लग्न करायला आवडेल?’ यावर प्रियांकाने अतिशय चातुर्याने उत्तर दिलं. प्रियांका म्हणाली की, मी क्रिकेटरशी लग्न करणं पसंत करेन. कारण यामुळे देशाभिमान तिच्यात कायम राहील. ‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू 2000 मध्ये प्रियांका फक्त 18 वर्षांची होती. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख आणि गौरीचं नातं तेव्हाच शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. एकवेळ तर अशी होती की, शाहरुख प्रियांकाशिवाय राहू शकत नव्हता. तो निर्मात्यांकडे प्रियांकाला सिनेमात घेण्यासाठी शब्द टाकायचा. सोनाली बेंद्रेला कॅन्सरमधून बाहेर काढायला ‘या’ अभिनेत्रीने केली सर्वात मोठी मदत आतापर्यंत प्रियांका आणि शाहरुखने ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. असं म्हटलं जातं की, गौरीकडून वॉर्निंग दिल्या गेल्यानंतर शाहरुखने प्रियांकाला भेटणं बंद केलं.