JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बींच्या नातवाला डेट करतेय शाहरुखची लेक? ख्रिसमस पार्टीत नात्यावर केलं शिक्कामोर्तब

बिग बींच्या नातवाला डेट करतेय शाहरुखची लेक? ख्रिसमस पार्टीत नात्यावर केलं शिक्कामोर्तब

कालच शाहरुख खानचा लेक आर्यन खान अभिनेत्री नोरी फतेहीला डेट करतोय अशी बातमी समोर आली होती. अशातच आता किंग खानची लेक सुहाना खान विषयी सुद्धा मोठी बातमी समोर येत आहे.

जाहिरात

सुहाना खान - अगस्त्य नंदा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी: कालच शाहरुख खानचा लेक आर्यन खान अभिनेत्री नोरी फतेहीला डेट करतोय अशी बातमी समोर आली होती. दोघांचेही दुबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आता किंग खानची लेक सुहाना खान विषयी सुद्धा मोठी बातमी समोर येत आहे. सुहाना सध्या अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. अगस्त्य आणि सुहाना यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जातोय. शाहरुख खानची लाडकी सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा  नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा यांच्यात डेटिंग होत असल्याच्या बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, यावेळी ख्रिसमस पार्टीमध्ये अगस्त्य नंदाने सुहाना सोबतच्या नात्यावर कुटुंबासमोर शिक्कामोर्तब केला आहे. हेही वाचा - बापानंतर लेकही चर्चेत; आर्यन खान पडला नोराच्या प्रेमात, ‘त्या’ फोटोनं चर्चांना उधाण रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शिका झोया अख्तरच्या द आर्चीजच्या सेटवरील एका स्रोताने पुष्टी केली आहे की सुहाना खान आणि अगस्त्य नंदा रिलेशनशिपमध्ये आहेत. 22 वर्षांची सुहाना आणि त्याच वर्षाच्या अगस्त्यमध्ये काहीतरी रोमँटिक सुरू आहे. यावर्षी, कपूर कुटुंबाने ख्रिसमस पार्टी दिली ज्यामध्ये ‘द आर्चीज’च्या स्टारकास्टलाही आमंत्रित करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा त्यांच्या कुटुंबात सामील झाला. जेव्हा ओळख झाली तेव्हा त्याने सुहानाची ‘पार्टनर म्हणून’ सांगून तिच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. एवढंच नाही तर त्याची आई श्वेता नंदाला देखील सुहाना आवडते.

संबंधित बातम्या

या दोघांमधील नात्याची सुरुवात झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या सेटवर झाली. सूत्राने सांगितले की ते दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात आणि ते त्यांचा बाँड लपवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. पण त्यांना सध्या हे नातं जाहीर करायचं नसल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. तसेच श्वेता नंदालाही सुहाना खूप आवडते आणि तिचा दोघांच्याही नात्यावर कुठलाच आक्षेप नाही, असंही कळतंय. प्रॉडक्शन हाऊसला 2022 मध्येच त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. दरम्यान, दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत असल्या तरी त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सेटवरचा बाँड फक्ती मैत्री आहे की त्या पलीकडे आहे, याबाबत येत्या काळातच कळेल.

झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट 2023 मध्ये ‘Netflix’ वर प्रदर्शित होणार आहे.  सुहाना खान आणि अगस्त्य नंदा सोबत या चित्रपटातून जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर देखील डेब्यू करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या