JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भाडीपाच्या 'बेरोजगार' चा दुसरा सीझन येणार?; सई ताम्हणकरनं पोस्ट शेअर करत दिली हिंट

भाडीपाच्या 'बेरोजगार' चा दुसरा सीझन येणार?; सई ताम्हणकरनं पोस्ट शेअर करत दिली हिंट

सई ताम्हणकरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत भाडीपाच्या ‘बेरोजगार’ चा दुसरा सीझन येणार? असल्याची हिंट दिली आहे. पाहा पोस्ट

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : बोल्ड आणि परखड मत मांडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. निरनिराळे फोटो, व्हिडीओ, प्रोजेक्टविषयीच्या नवीन अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत शअर करत असते. नुकतच अभिनेत्रीनं आपल्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. इन्स्टाग्रामवर सईनं एक फोटो शेअर करत चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. याचीच चर्चा होताना पहायला मिळत आहे. सईनं पोस्ट शेअर करत ‘बेरोजगार’ वेबसिरीजचा दुसरा पार्ट पहायला आवडेल का ? असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. म्हणजे लवकरच ‘बेरोजगार’ वेबसिरीजचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर येतंय. भाडीपानं एक अनोखा प्रयोग करत बेरोजगार ही मराठी बेवसरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. या सिरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रेक्षकांनी दुसऱ्या भागासाठी खूप विनवणी केल्याचं पहायला मिळालं. मात्र आता सईनं पोस्ट करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे आणि चाहत्यांना हिंटही दिली आहे.

संबंधित बातम्या

भाडीपाच्या मराठी वेबसिरीजचं नाव ‘बेरोजगार’ असलं तरी खऱ्या अर्थाने हे ‘बी. इ. रोजगार’ असे आहे. बी. इ. हा म्हटलं की आपल्यापुढे लगेचच लाखो इंजिनियर्स उभे राहतात. अशाच तरुण इंजिनियर्सची व्यथा आणि त्यांच्या रोजगाराची विनोदी पद्धतीने कथा मांडताना भाडीपानं ही सेरिज बनवलेली पहायला मिळाली. बेरोजगारच्या पहिल्या सीझनमध्ये विदर्भातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग पास झालेल्या ‘पियू’ची भूमिका सईने केली आहे. तिच्यासोबत संभाजी ससाणेनं ‘पापड्या’ एक बदमाश कोल्हापुरी मुलाची भूमिका साकरली आहे. जगदीश कन्नम ज्याने स्मार्ट आणि जटिल ‘अक्षय’ची भूमिका केली आहे. गावापासून शहरापर्यंत घराघरातल्या प्रत्येक तरुणाची व्यथा ही वेबसिरीजमधून पहायला मिळते. म्हणूनच प्रेक्षकांनी या सिरिजला चांगला प्रतिसाद दिला. हेही वाचा -   Sushmita Sen Lalit Modi: ‘खूप झालं स्पष्टीकरण…’; डेटिंगच्या बातमींनंतर पहिल्यांदाच रिऍक्ट झाली सुष्मिता भाडीपानं बनवलेल्या वेबसिरिजच्या पहिल्या सीझनमध्ये इंजिनियरिंग केलेल्या हे तीन मित्रांनी खूप धमाल केलेली पहायला मिळाली. स्वप्नांची पुर्तता करताना त्यांचा काय गोंधळ उडाला हेही पहायला मिळालं. मात्र आता दुसऱ्या सीझनमध्ये काय पहायला मिळणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या