सत्य प्रेम की कथा स्टारकास्ट फी
मुंबई, 07 जून : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा आगामी चित्रपट ‘सत्य प्रेम की कथा’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कार्तिक आणि कियारा ही जोडी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांनी याआधी ‘भुलभुलैय्या २’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट खूपच हिट झाला होता. म्हणून आता चाहते पुन्हा या चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटासाठी कार्तिक आणि कियाराने किती मानधन घेतलं आहे याबद्दल नुकतीच माहिती समोर आली आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. ट्रेलरनंतर प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठमोळे दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, ‘सत्यप्रेम की कथा’ 50-60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आली आहे आणि त्याव्यतिरिक्त 5 कोटी रुपये प्रमोशनवर खर्च केले जाणार आहेत. पोर्टलचा दावा आहे की कार्तिक आर्यन या चित्रपटासाठी तब्बल 25 कोटी रुपये आकारत आहे. गेल्या वर्षी ‘भूल भुलैया 2’ च्या बंपर यशानंतर त्याने आपली फी वाढवली आहे. गेल्या वर्षी कार्तिकच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 220 कोटींहून अधिक कमाई केली होती. 2022 चा हा चौथा सर्वात यशस्वी चित्रपट होता. Prabhas: प्रभासच्या लग्नाचं ठिकाणही ठरलं! ‘या’ देवस्थानी पार पडणार अभिनेत्याचा विवाहसोहळा दुसरीकडे, कियारा अडवाणीने ‘सत्यप्रेम की कथा’साठी 4 कोटी रुपये घेतले. गजराज राव कार्तिकच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी एक कोटी रुपये घेतले आहेत. सुप्रिया पाठक यांनी चित्रपटात कार्तिक आर्यनच्या आईची भूमिका साकारली असून त्यांना या भूमिकेसाठी ७५ लाख रुपये मिळत आहेत. सत्यप्रेम की कथा हा एक रोमँटिक चित्रपट आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची लव्हस्टोरी पाहता येणार आहे. काही रिपोर्टनुसार या चित्रपटाचं नाव ‘सत्यनारायण की कथा’ असं ठेवण्यात आलं होतं पण नंतर ते बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ असं ठेवण्यात आलं. कार्तिक आणि कियाराच्या या चित्रपटात अभिनयासोबतच नयनरम्य दृश्य आणि दमदार संगीत ऐकायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग गेल्या महिन्यातच पूर्ण झाले होते, त्यानंतर कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक भावनिक नोट लिहिली होती. हा चित्रपट ‘हार्टब्रेक आणि इमोशन्सचा रोलर कोस्टर राईड’ असल्याचे त्याने सांगितले होते. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच आतुर आहेत.