मुंबई 09 मार्च : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक असलेले सतीश कौशिक आता या जगात नाहीत. नुकतंच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. सतीश यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आणि त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया. Satish Kaushik: दोन दिवसांपूर्वी सतीश कौशिक यांनी केलेलं ट्विट;‘ती’पोस्ट ठरली शेवटची सुपरस्टार बायोच्या अहवालानुसार, सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती सुमारे 15 मिलियन डॉलर इतकी आहे. त्यांची कारकीर्द 35 वर्षांपेक्षा जास्त आहे. मासूम या चित्रपटातून शेखर कपूरचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. श्रीदेवीच्या रूप की रानी चोरों का राजा या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाले तर 1985 मध्ये सतीश कौशिक यांनी शशी कौशिक यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील होता, ज्याचं नाव शानू होतं. परंतु 1996 मध्ये वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, ज्यामुळे ते तुटले. मात्र, त्यांनी हिंमत हारली नाही. 16 वर्षांनंतर सरोगसीच्या माध्यमातून ते एका मुलीचे वडील झाले. त्यांनी वंशिकाचे त्यांच्या घरी स्वागत केले. 2 दिवसांपूर्वी कलाकारांसोबत होळी खेळले अन् आता अचानक निधन, प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हरपला नीना गुप्तासोबत लग्न करणार होते नीना गुप्ता तरुणपणात क्रिकेटर विवियन रिचर्ड्सच्या प्रेमात पडल्या होत्या. ही अभिनेत्री लग्नाआधीच गरोदर राहिली होती आणि विवियन आधीच विवाहित असल्याने तो तिच्याशी लग्न करू शकला नाही.
मात्र, त्यावेळी सतीश कौशिक यांनी नीनासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अभिनेत्रीने नकार दिला.