मुंबई, 13 फेब्रुवारी : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’चं जोरदार प्रमोशन करत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री आणि डेटिंगच्या चर्चा यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तर दुसरीकडे या दोघांमधील गाढ मैत्री सुद्धा त्यांना लपवता येत नाही. पण काही दिवसांपूर्वी पिंकव्हिलाला दिलेल्या एक मुलाखतीत सारानं कार्तिक आर्यनला डेट करत नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नुकत्याच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सारा अली खान सर्वांसमोर कार्तिक आर्यनवर भडकलेली दिसली… सारा आणि कार्तिक सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यातील वाद सर्वांसमोर आला. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एका बसवर चढलेला दिसत आहे. त्यानंतर तो साराला मी बसवरून उडी मारत आहे असं सांगितल ज्यामुळे साराचा पारा चढला आणि ती तुला जे वाटेल ते कर असं म्हणून तिथून निघून जाताना दिसली. 23 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह
खरं तर एका डान्स शो दरम्यान कार्तिकच्या हाताला दुखापत झालेली आहे. त्यामुळे सारानं काळाजीपोटी त्याला असं करण्यास मनाई केली मात्र तरीही कार्तिक अरे प्रमोशनसाठी आलो आहोत असं म्हणाला. त्यामुळे कार्तिक आपलं ऐकत नाही हे पाहिल्यावर साराला राग आला आणि तिनं सर्वांसमोर त्याला तुझी मर्जी जे करायचं ते कर असं म्हटलं. एवढं झाल्यावरही कार्तिकनं तिचं ऐकलं नाही आणि त्यानं बसवरून उडी मारलीच ही गोष्ट साराला अजिबात आवाडली नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स यांचं निधन
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे. VIDEO : नेहा-आदित्यची रोमँटीक केमिस्ट्री, ‘Goa Beach’चा सोशल मीडियावर धुमाकूळ