JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sankarshan Karhade: प्रसाद ओकची संकर्षण कऱ्हाडेला कल्टी; पार्टीच्या नावाखाली करून घेणार 'हे' काम

Sankarshan Karhade: प्रसाद ओकची संकर्षण कऱ्हाडेला कल्टी; पार्टीच्या नावाखाली करून घेणार 'हे' काम

नुकतंच संकर्षणने प्रसाद ओक विषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे. काय म्हणाला आहे तो पाहा

जाहिरात

प्रसाद ओक -संकर्षण कऱ्हाडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जानेवारी:  अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे   याचंही नाव या पंक्तीत प्रामुख्याने घेता येईल. संकर्षणच्या मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे. झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधला समीर तसेच ‘आम्ही सारे खवय्ये’ मधून सूत्रसंचालक म्हणून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला येतो. पण सध्या त्याच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे प्रयोग देखील जोरदार प्रयोग सुरु आहेत. नुकतंच त्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. संकर्षणच्या  ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा दिग्दर्शक हा अभिनेता प्रसाद ओक आहे. या नाटकाचे नुकतेच २७५ प्रयोग पूर्ण झाले आहेत. आता या नाटकाची ३०० व्या प्रयोगाकडे वाटचाल आहे. या नाटकाला प्रसादने नुकतीच हजेरी लावली होती. त्यानिमित्त संकर्षणने प्रसादविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणने लिहिलं आहे कि, ‘काल #तूम्हणशीलतसं नाटकाचे आमचे दिग्दर्शक.. “प्रसाद ओक” सर.. पुण्यात अचानक प्रयोगाला आले…प्रसाद : किती झाले प्रयोग…?’’ हेही वाचा - Ved Movie: ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना रितेशला मात्र चाहत्याचा खोचक सल्ला त्याने पुढे लिहिलंय कि, ‘‘मी : २७५ होतील आता .. (मला वाटलं .. आता शाबासकी देइल आणि म्हणेल पार्टी करू…) प्रसाद : ३०० पूर्ण झाले .. कि….(पार्टी हाच शब्दं ऐकु येणार ह्याची खात्री मला पटली .. ) २ दिवस परत रिहर्सल करु.. म्हणजे मलाही कळेल कि , तुम्ही मीच बसवलेलंच नाटक करता की नाही…असो …. Prasad Oak ब्रो भेटून गेला कि , मस्तं वाटतं…’’ अशा शब्दात संकर्षणाने प्रसादविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.संकर्षणच्या या पोस्टखाली अनेक कलाकारांसह चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

संबंधित बातम्या

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या त्याच्या मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकारली आहे. या मालिकेने त्याला घराघरात लोकप्रिय केलं पण आता ही मालिका प्रेक्षकांचा  निरोप घेणार आहे.

या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर संकर्षण सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कविता प्रचंड व्हायरल होतात. आता समीर या भूमिकेनंतर तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो त्याची उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या