JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sankarshan Karhade: 'मी घेत नव्हतो पण...' संकर्षणने सांगितला नाटकाच्या प्रयोगानंतर घडलेला 'तो' प्रसंग

Sankarshan Karhade: 'मी घेत नव्हतो पण...' संकर्षणने सांगितला नाटकाच्या प्रयोगानंतर घडलेला 'तो' प्रसंग

सध्या संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे प्रयोग देखील जोरदार प्रयोग सुरु आहेत. नुकतंच त्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी :  अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे  याचंही नाव या पंक्तीत प्रामुख्याने घेता येईल. संकर्षणच्या मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे. पण सध्या संकर्षणच्या  ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे प्रयोग देखील जोरदार प्रयोग सुरु आहेत. नुकतंच त्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या रोजच्या आयुष्यातील घडमोडीही प्रेक्षक-चाहत्यांबरोबर शेअर करतो. तसंच  त्याला मराठी नाटकांच्या प्रयोगादरम्यान विविध अनुभव येतात. ते संकर्षण चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो. आताही तसंच काहीसं घडलं आहे. ‘तू म्हणशील तसं’ नाटकाच्या प्रयोगावेळी संकर्षणला एक छान अनुभव आला तो त्याने शेअर केला आहे. Shashank ketkar: ‘आपण हिंदीचं अनुकरण…’ ‘ती’ चूक दाखवत शशांक केतकरने लेखक, दिग्दर्शकांवर साधला निशाणा संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे सध्या जोरदार प्रयोग चालू आहेत. याच नाटकाच्या प्रयोगानंतर संकर्षणला एक चाहते भेटायला आले. यादरम्यान त्यांनी संकर्षणंच तोंडभरून कौतुक तर केलंच शिवाय त्याला खास बक्षीसही दिलं. हाच अनुभव सांगत अभिनेत्याने लिहिलंय कि, ‘म्हणुन “रसिक प्रेक्षक माय बाप आहेत..” आज #तूम्हणशीलतसं चा ३०० वा प्रयोग पार पडला.. प्रयोगानंतर एक काका काकु आले मला म्हणाले , “आम्ही , अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले ह्या सगळ्यांची नाटकं पाहात आलोय.. त्यांची कामं पाहातांना सकारात्मक उर्जा जाणवायची , जाणवते.. तीच उर्जा तुझ्या कामांत आणि प्रेजेन्स मध्ये आहे.. ति टिकवून ठेव.. आणि खाउ साठी हे ५०० रूपये घे..”

संकर्षण पुढे म्हणतोय कि, ‘‘मी घेत नव्हतो.. पण त्यांचा आग्रह मी मोडला नाही..आई बाबा खाउ साठी पैसे देतात , तसेच ४०० रुपयांचं तिकिट काढून परत वेगळे खाउ चे ५०० रुपये द्यावे वाटणं ही फार मोठी गोष्टं आहे.…सोबतच मोठ्या मनाने दिलेली दाद आहेच.. म्हणुन तुम्ही “माय बापच” आहात…अशाच शुभेच्छा कायम ठेवा.. ’’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या त्याच्या मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’  या मालिकेने संकर्षणला घराघरात लोकप्रिय केलं. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर संकर्षण सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कविता प्रचंड व्हायरल होतात. आता समीर या भूमिकेनंतर तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो त्याची उत्सुकता आहे. शिवाय ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाबरोबरच त्यांने लिहिलेलं आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या