संकर्षण कऱ्हाडे
मुंबई, 20 जुलै : अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे याचंही नाव या पंक्तीत प्रामुख्याने घेता येईल. संकर्षणच्या मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे. संकर्षणच्या झी मराठीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधला समीर तसेच ‘आम्ही सारे खवय्ये’ मधून सूत्रसंचालक या भूमिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तर सध्या त्याच्या ‘तू म्हणशील तसं’,’ नियम व अटी लागू’ या नाटकांचे प्रयोग देखील जोरदार प्रयोग सुरु आहेत. पण सध्या त्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर केलेली एक पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतेय. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष एकत्र येत सरकार चालवत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया देत मत व्यक्त केलं आहे. याविषयीच्या कलाकारांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. आता मात्र संकर्षणने केलेली एक पोस्ट मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधते आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आजचे फोटो शेअर करत संकर्षणने लिहिलंय की, ‘‘मी कधीही राजकीय नेत्यांवर भाष्यं करत नाही.. त्या संदर्भात पोस्ट तर करतच नाही.. कारण तो माझा प्रांत नाही .. मला त्यातलं ज्ञान नाही..पण, आज Social Media वर तीन वेगवेगळ्या पोस्टं पाहिल्या आणि खरंच छान वाटलं..’’ Shriya Pilgaonkar : महागुरू मालदीव मध्ये कुटुंबासोबत घालवतायत असा वेळ; लेकीच्या बोल्ड अंदाजानं वेधलं लक्ष पुढे तो म्हणतोय की, ‘‘१) घटनास्थळी धावलेले , पुनर्वसनाचे आश्वासन देणारे “मुख्यमंत्री “… २) त्यांच दुर्दैवी घटनांचा आढावा घेणारे , नियोजन पाहाणारे “उपमुख्यमंत्री आणि ३) “वंदे मातरम् “ विषयी संयममाने , योग्यं शब्दात समज देणारे “उपमुख्यमंत्री “ … तिघेही वेगळ्या पक्षाचे .. पण बरं वाटलं कि ; एकाच वेळी आमचं रक्षण, नियोजन आणि स्वाभिमान तिन्ही गोष्टिंविषयी तळमळीने कुणीतरी काम करतंय … शेवटी तुम्हा आम्हाला काय हवं .. ?? तेच नं ..!!!!’’
संकर्षणची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया नोंदवत आहेत. चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर ‘खूप छान.. असाच एकजुटीने सर्व पक्ष एक झाले तर अशी नियोजन सोप्प होता.’ ‘दादा एक नंबर विश्लेषण…’ असं म्हणत त्याची पाठ थोपटली आहे. तर काहींनी त्याला ‘दादा तुला खरंच सांगतो तु ह्या राजकारणात पडू नको’ असा सल्ला देखील दिला आहे.