संकर्षण कऱ्हाडे
मुंबई, 05 ऑक्टोबर : आज दसऱ्याच्या निमित्ताने सगळीकडे उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण आहे. सगळे आपापल्या घरी उत्साहात दसरा साजरा साजरा करतायत. आपट्याची पानं लुटून आनंद साजरा करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. मराठी कलाकार सुद्धा चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. संकर्षण कऱ्हाडेने सुद्धा चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण आज त्याला एका गोष्टीची खंत आहे. अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे याचंही नाव या पंक्तीत घेता येईल. संकर्षणच्या मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. तो मुंबईत आता रुळला असला तरी कायमच परभणीची आठवण येत असते. नुकतंच त्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या कामाबद्दल नेहमी अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वी तो लंडनमध्ये कामानिमित्त गेला होता. यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन कामात गुंतला आहे. नुकतंच त्याने त्याच्या नाटकानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही फोटोही पोस्ट केले आहेत. यात त्याने गावाकडची माणसं भेटल्यानंतर काय आनंद होतो याबद्दल मत व्यक्त केले आहे. त्याला नाटकानंतर परभणीची माणसं भेटली. तेव्हा त्याला आपल्या घराची आठवण आल्याशिवाय राहिलं नाही. त्याने फोटो पोस्ट करत छान कॅप्शन दिलं आहे. हेही वाचा - Ritesh Deshmukh : बॉयकॉट बॉलिवूडच्या वादात आता रितेशची उडी; म्हणाला ‘मला त्याचा काही फरक…’ त्याने लिहिलंय कि, ‘‘आत्ता ठाण्यात रात्रीच्या गडकरी च्या प्रयोगा नंतर एक जोडपं भेटलं..मला म्हणाले ; “दादा , आम्ही पण परभणीचे आहोत.. यंदा दिवाळी ला जाणार.. दसरा इथच..ह्या वेळी कामामुळे मला घरी , आई बाबांकडे जाता येत नाहीये ह्याचं थोडं वाईट वाटत होतंच.. आणि त्यात ह्यांची भेट झाली. आहो काय सांगु .. आपल्या गावाकडं जाणारी एस. टि. दिसली तरी बरं वाटतं .. ही तर “गावाकडची माणसं..” लई बरं वाटलं’’. पुढे तो म्हणतोय, बघा..!तुमचं गाव कुठलं ..? सांगा बरं .. ! यंदा तुमचा दसरा कुठं ..? सांगा बरं ..!!’’
संकर्षणाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. त्याची ही पोस्ट अनेकांना भावली आहे. त्याची ही पोस्ट पाहून अनेकांना आपल्या गावची तिथल्या सणांची आठवण झाली आहे. आपण कुठेही गेलो तरी आपलं मूळ गाव कधीच विसरत नाही हेच संकर्षणाच्या या पोस्टवरून कळतं आहे.
दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या त्याच्या मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकरली आहे. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर त्याने अलिकडेच एक कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ही कविता प्रचंड व्हायरल झाली होती.