JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / संजीव कुमारांना आधीच आली होती मृत्यूची कल्पना; 'या' कारणामुळे घेतला आयुष्यभर एकटंच राहण्याचा निर्णय

संजीव कुमारांना आधीच आली होती मृत्यूची कल्पना; 'या' कारणामुळे घेतला आयुष्यभर एकटंच राहण्याचा निर्णय

संजीव कुमार यांनी तरुण वयातच कधी आजोबा तर कधी वडिलांची साकारली, पण खऱ्या आयुष्यात वयाची पन्नाशीही गाठता आली नाही.आज संजीव कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

जाहिरात

संजीव कुमार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै :    काही स्टार्सनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे संजीव कुमार. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने एवढी प्रतिष्ठा मिळवली होती की ज्यापर्यंत पोहोचणे हे आजच्या काळातील प्रत्येक कलाकाराचे स्वप्न आहे. ९ जुलै १९३८ रोजी जन्मलेल्या संजीव कुमार यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे संजीव मात्र अल्पायुषी ठरले. संजीव कुमार यांनी तरुण वयातच कधी आजोबा तर कधी वडिलांची  साकारली, पण खऱ्या आयुष्यात वयाची पन्नाशीही गाठता आली नाही.आज संजीव कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. संजीव कुमार त्यांच्या करिअरसोबतच खाजगी आयुष्यात देखील चर्चेत होते. शोले चित्रपटातील त्यांची ठाकूरची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करू आहे. पण याच चित्रपटादरम्यान त्यांचं आयुष्यातील प्रेम अधुरं राहीलं होतं. काही रिपोर्टनुसार असं म्हटलं जातं की, संजीव कुमार हेमा मालिनीवर जीवापाड प्रेम करायचे. पण शोले चित्रपटादरम्यान हेमा आणि धर्मेंद्र यांची गाठ जुळली आणि संजीव कुमारांचं प्रेम अधुरंच राहिलं. त्यामुळेच संजीव कुमार यांनी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.

पण काही रिपोर्टमध्ये त्यांनी लग्न न करण्याचं कारण म्हणजे, संजीव कुमार यांना वयाच्या पन्नाशीपूर्वीच मृत्यू होणार असल्याची जाणीव झाली होती. या भीतीपोटीच त्यांनी लग्नही केले नाही, असं देखील म्हटलं जातं. अवघ्या 47 व्या वर्षी संजीव यांनी जगाचा निरोप घेतला होता.  संजीवच्या आयुष्यातील एक आश्चर्यकारण गोष्ट म्हणजे त्यांचे आजोबा, वडील आणि भावांप्रमाणेच संजीव कुमारचाही अचानक मृत्यू झाला होता. संजीव कुमार यांनी तरुण वयातच कधी आजोबा तर कधी वडिलांची  साकारली, पण खऱ्या आयुष्यात वयाची पन्नाशीही गाठता आली नाही. 2 आलिशान घरं अन् वर्षाकाठी इतक्या कोटींची कमाई करते दीपिका; नेटवर्थ मध्ये अनुष्का-कतरिनाला सोडलं पिछाडीवर संजीव कुमार यांनी एकदा वृद्ध व्यक्तीची भूमिका करण्याचे एक मनोरंजक पण आश्चर्यकारक कारण सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तबस्सुमने एकदा त्याला विचारले होते की, ‘तू एवढा तरुण असूनही वृद्धाची भूमिका का करतोस?’ यावर संजीव म्हणाले होते, ‘मी कधीही म्हातारा होणार नाही, कारण माझ्या कुटुंबातील इतर पुरुषांप्रमाणेच मी 50 वर्षांच्या पुढे जगणार नाही. त्यामुळे मला पडद्यावर म्हातारा होण्याचा अनुभव घ्यायचा आहे.’ संजीव कुमार यांचा अंदाज खरा ठरला, कारण 1985 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय सुमारे ४७ वर्षे होते. ‘अ‍ॅन अॅक्टर्स अॅक्टर: द ऑथोराइज्ड बायोग्राफी ऑफ संजीव कुमार’ हे पुस्तक लिहिणाऱ्या हनीफ झवेरी यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याचे आजोबा शिवलाल जरीवाला, जेठालाल जरीवाला, भाऊ किशोर जरीवाला आणि निकुल जरीवाला यांचे वयाच्या 50 वर्षांच्या आतच असताना निधन झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. संजीव कुमार यांना एक पूर्वकल्पना होती की ते लवकरच मरणार आहेत, कदाचित म्हणूनच ते आयुष्यभर बॅचलर राहिले. पण तेव्हा अनेक महिलांनी त्यांच्या आयुष्यात एंट्री केली होती. हेमा मालिनी, सुलक्षणा पंडित यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. त्यांनी हेमा मालिनीला प्रपोज केले, पण अभिनेत्रीने त्यांचा प्रस्ताव नाकारला, हे त्यांच्या बॅचलरहुडचे आणखी एक कारण असू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या