JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बायकोला सोडून संजय दत्त आता या मुलीच्या प्रेमात, I Love You म्हणतानाचा व्हिडीओ आला समोर

बायकोला सोडून संजय दत्त आता या मुलीच्या प्रेमात, I Love You म्हणतानाचा व्हिडीओ आला समोर

एका मुलीसोबत फ्लर्ट करतानाचा त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या अफेअर्स बद्दल जवळपास सर्वांनाच माहित आहे. एकेकाळी त्याच्या बॉलिवूड करिअरपेक्षा त्याचं खासगी आयुष्यच जास्त चर्चेत राहिलं होतं. संजय काही वर्षांपूर्वीच मान्यता द्त्तशी तिसरं लग्न केलं. पण नुकताच एका मुलीला I Love You म्हणतानाचा संजू बाबा नुकताच कॅमेऱ्यात कैद झाला. एका मुलीसोबत फ्लर्ट करतानाचा त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये संजय दत्त लपून-छपून पूजा नावाच्या एक मुलीशी फोनवर बोलताना दिसत आहे. रोमँटिक अंदाजात बोलणाऱ्या संजू बाबाची नजर अचानकपणे कॅमेरावर पडते आणि तो कॅमेरामनवर चिडताना दिसतो आणि त्याला शूट बंद करायला सांगतो. त्यानंतर संजय पुन्हा एकदा फोनवर बोलू लागतो. यावेळी तो तिला कुठे भेटणार हे सुद्धा विचारताना दिसत आहे. दोन घटस्फोट, वादग्रस्त आयुष्य; आता ‘हा’ स्टार 25 वर्षांच्या तरुणीशी रिलेशनमध्ये

संजयचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असला तरीही हा खरा खुरा व्हिडीओ नाही तर अभिनेता आयुष्यमान खुरानाचा आगामी सिनेमा ड्रीम गर्लच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आलेला व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ एकता कपूरनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये संजूबाबा ज्या पूजाशी बोलताना दिसत आहे ती पूजा म्हणजे आयुष्यमानच्या सिनेमातील पात्र आहे. बऱ्याच काळानंतर संजू बाबाचा हा अंदाज त्याचा चाहत्याच्या पसंतीत उतरला आहे. The Sky Is Pink : मुलीला जगवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पालकांची इमोशनल कहाणी

हा व्हिडीओ शेअर करताना एकता कपूरनं लिहिलं, ‘ड्रीम गर्लला भेटायला मुन्नाभाई उत्सुक’ संजय दत्तच्या या व्हिडीओचं सर्वजण खूप कौतुक करत आहेत. आयुष्यमान खुराना आणि नुसरत भारुचा यांच्या मुख्य भूमिका असलेला ड्रीमगर्ल हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयुष्यमान या सिनेमात अशा मुलाची भूमिका साकारली आहे जो नोकरीसाठी मुलीच्या आवाजात बोलायला तयार होतो. त्याला कॉलसेंटरमध्ये नोकरी मिळते. यासोबत त्याचं नाव सुद्धा बदलतं आणि त्यानंतर जो काही गोंधळ होतो. तो पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरला जावंच लागेल. परदेशात 11 महिने 11 दिवस कॅन्सरवर उपचार घेऊन ऋषी कपूर यांची घरवापसी ===================================================== VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या