JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: वाह दादा वाह! भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी समीर चौगुले थेट ऑस्ट्रेलियात

VIDEO: वाह दादा वाह! भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी समीर चौगुले थेट ऑस्ट्रेलियात

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून समीर चौगुलेंनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं. आता समीर चौघुले हे थेट मेलबर्न, ऑस्ट्रेलियात जाऊन पोहचले आहेत. तिथून त्यांनी एक आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

जाहिरात

समीर चौघुले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे समीर चौगुलें नी प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केले आहे.विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौगुले होय. समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘फू बाई फू’, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून समीर चौगुले हे नाव घराघरांत पोहचलं. आता महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं. आता समीर चौघुले हे थेट मेलबर्न, ऑस्ट्रेलियात जाऊन पोहचले आहेत. तिथून त्यांनी एक आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आज मेलबर्न, ऑस्ट्रेलियात  भारत - पाकिस्तानचा टी २० मॅच रंगला आहे. हा मॅच प्रत्यक्षात बघायला मिळणं  हे प्रत्येकाचं स्वप्नच असतं. समीर चौघुलेंचं  हे स्वप्न पूर्ण झालं आहे. ते सध्या मेलबर्न मध्ये भारत - पाकिस्तानचा सामना लाईव्ह पाहण्याचा आनंद लुटत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही  माहिती दिली आहे. हेही वाचा - Nagraj Manjule: दिवाळीच्या मुहूर्तावर नागराज मंजुळेंचा धमाका; केल्या महत्त्वाच्या घोषणा समीर चौघुले यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधून काही दिवसांसाठी  ब्रेक घेतला  आहे. ते आता परदेशात म्हणजेच ऑस्ट्रेलियात गेले आहेत. समीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे विमानामधील एक फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. ऑस्ट्रेलियात  जाण्याचं कारण सुद्धा अगदी खास आहे. कारण विश्वास सोहनी नाट्यमहोत्सव मेलबर्नमध्ये असणार आहे. या नाट्यमहोत्सवासाठीच समीर चौघुले ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. आता समीर चौघुले ऑस्ट्रेलियात लाईव्ह क्रिकेटचा सामना पाहत आहेत.

संबंधित बातम्या

नुकताचा समीर यांनी भारत- पाकिस्तान सामन्यांदरम्यानचा तिथल्या स्टेडियममध्ये समीर यांनी लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबरोबरच हा आयुष्यातील पहिला लाईव्ह क्रिकेट सामना बघत असल्याचंही समीर यांनी या व्हिडिओत नमूद केलं आहे. स्टेडियममधील वातावरण पाहून समीर चांगलेच भारावून गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. समीर यांच्या या सोशल मीडियावरील अपडेट्सना त्यांचे चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. त्यांच्या या व्हिडिओवर सुद्धा चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेते समीर चौगुले हे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्यांच्या याच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.लवकरच ऑस्ट्रेलियामधील ही टुर संपवून समीर लवकरच हास्यजत्रेच्या चित्रीकरणाला सुरुवात करतील.आता समीर चौगुले हास्यजत्रेमध्ये पुन्हा कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या