JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमानला तलब झाली अन् कॅमेरासमोरचं ओढली सिगरेट, बिग बॉस ओटीटीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

सलमानला तलब झाली अन् कॅमेरासमोरचं ओढली सिगरेट, बिग बॉस ओटीटीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss OTT 2 चा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान खान नॅशनल कॅमेरासमोर सिगरेट ओढताना दिसत आहे.

जाहिरात

सलमानला तलब झाली अन् कॅमेरासमोरचं ओढली सिगरेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने बिग बॉस ओटीटीमधून पदार्पण केले आहे. बिग बॉस १६ चं होस्टिंग केल्यानंतर सलमान आता बिग बॉस ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. अशातच Bigg Boss OTT 2 चा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान खान नॅशनल कॅमेरासमोर सिगरेट ओढताना दिसत आहे. सध्या सगळीकडे या व्हिडिओची चर्चा रंगलेली आहे. बिग बॉस OTT 2 शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. अशातच शोला दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे Bigg Boss OTT 2 चे चाहते आनंदात आहेत. या विकेंडच्या वारमध्ये सलमान चर्चेत असल्याचं आणखी एक कारण ठरला आहे. या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान एका हातात सिगारेट दिसली. वाचा- ‘देशाचे नेते अशिक्षित…’ त्या वक्तव्यामुळे ट्रोल होताच काजोलने दिलं स्पष्टीकरण बिग बॉस ओटीटीच्या घरात सगळीकडे कॅमेरे आहेत. प्रत्येक हालचाल हे कॅंमेरे टिपत असतात. सलमान देखील यापासून वाचू शकला नाही. अशाच एका कॅमेराने सलमानची एक कृती पकडण्यात यश मिळविले. या क्लिकमध्ये सलमानने सिगारेट धरलेली दिसतेय. त्याच्या या कृतीवर अनेकांनी कमेंट करत विविध प्रतिक्रिय दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

एका युजरने म्हटलं आहे की, आम्हाला माहित आहे की सलमान ढोंगी आहे. पण सलमान जर इतरांना व्याख्यान देत असेल तर किमान त्यांच्यासमोर तरी चांगलं वागायचं. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, हे OTT वर आहे. आणि नॅशनल टिव्ही नाही त्यामुळे मला वाटते की यामध्ये कोणतीही कायदेशीर समस्या नाही.पण तो इतका ढोंगी आहे. स्पर्धकांना संस्कृती आणि विकृतीबद्दल व्याख्यान देतो आणि स्वतः प्रत्येक चुकीचे काम करत असतो. सलमान नेहमी स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो पण नेटकऱ्यांनी मात्र आता सलमानचीच शाळा घेतली आहे.

काही लोकांनी सलमान खानच्या फोटोवर संशय व्यक्त केला की ही सिगारेट नसून पेपर आहे. एका चाहत्याने लिहिले की अनेकदा लोक सिगारेट ओढतात पण हा गुन्हा नाही. त्याचवेळी एका चाहत्याने हा पेपर असल्याचा दावा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या