JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Salman khan: सलमान खानने रितेशला दिलं लै भारी गिफ्ट; म्हणाला भाऊचा बर्थडे...

Salman khan: सलमान खानने रितेशला दिलं लै भारी गिफ्ट; म्हणाला भाऊचा बर्थडे...

रितेश आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मैत्रीविषयी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता रितेशला वाढदिवसाच्या निमित्तानं सलमाननं शुभेच्छा देत खास गिफ्ट देखील दिलं आहे.

जाहिरात

सलमान खान -रितेश देशमुख

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : रितेश देशमुख हा बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश आज 17 डिसेंबर रोजी आपला  44 वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेश सध्या त्याच्या आगामी ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे रितेशनं दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. हा चित्रपट एक सुंदर प्रेमकहाणी असून रितेश  या चित्रपटात जिनिलिया सोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेश आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मैत्रीविषयी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता रितेशला वाढदिवसाच्या निमित्तानं सलमाननं शुभेच्छा देत खास गिफ्ट देखील दिलं आहे. सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, हा व्हिडीओ म्हणजे ‘वेड’ चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ आहे.  सलमाननं रितेशच्या वेड चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. सलमान या चित्रपटात  ‘वेड लावलय’ या गाण्यात पाहुणा कलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं टीझर शेअर करत त्यानं रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा - VIDEO: अक्षयला रडताना पाहून सलमानलाही अश्रू अनावर; मित्रासाठी केली खास पोस्ट ‘वेड लावलय’ या गाण्याचा जबरदस्त टिझर शेअर करत सलमाननं लिहिलंय कि, ‘भाऊचा बर्थडे आहे भेट तर द्यायची होतीच’. या व्हिडिओत सलमान आणि रितेश दोघेही जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहेत. सलमानची स्टाइल नेहमीच वेगळी असते, जी त्याच्या चाहत्यांना आवडते. यामुळेच रितेशने आपल्या चित्रपटात सलमानला खास पाहुणा म्हणून घेतले आहे. एवढंच  नाही तर रितेशचा पहिला मराठी चित्रपट ‘लय भारी’ मध्ये देखील सलमानची एक छोटी झलक पाहायला मिळाली होती.

संबंधित बातम्या

सलमान आणि रितेशची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला अडतेच. त्यामुळे सलमानने शेअर केलेला हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. आता चाहत्यांना पूर्ण गाणं पाहण्याची आस लागली आहे. ‘वेड’ चित्रपटाला अजय अतुल यांचं दमदार संगीत आहे. या चित्रपटातील ‘वेड तुझे’ आणि ‘बेसुरी’ हे गाणे आधीच हिट झाले आहेत. त्यामुळे हे नवं गाणं सुद्धा धुमाकूळ घालणार हे निश्चित आहे.

दरम्यान,रितेशच्या ‘वेड’ या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलिया देखील दिसणार आहे. त्यानं ‘वेड’चा ट्रेलर शेअर करताच प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी जान’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या