JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / साजिद नाडियाडवाला- सलमान एका दिवशीच बांधणार होते लग्नगाठ, पण ऐनवेळी ते दोन शब्द बोलून अभिनेत्यानं दिला नकार

साजिद नाडियाडवाला- सलमान एका दिवशीच बांधणार होते लग्नगाठ, पण ऐनवेळी ते दोन शब्द बोलून अभिनेत्यानं दिला नकार

एककाळ असा होता तेव्हा सलमान खानला देखील लग्न करायचे होते. लग्नापासून लांब पळणाऱ्या सलमाननं देखील संसार थाटायचं स्वप्न पाहयलं होतं. पण माशी कुठं शिंकली…असा प्रश्न पडतो. याचाच एक किस्सा आपण जाणून घेणार आहे.

जाहिरात

साजिद नाडियाडवाला- सलमान एका दिवशीच बांधणार होते लग्नगाठ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 एप्रिल- सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi ki jaan) या सिनेमामुळं चर्चेत आहे. मात्र सलमान आणखी एका कारणामुळं नेहमीच चर्चेत असतो. वारंवार सलमानला याबद्दल प्रश्न देखील विचारला जातो. हा प्रश्न म्हणजे लग्न कधी करणार ? सलमान नेहमीच याचं उत्तर देणं टाळताना दिसतो. सलमना कधी लग्न करणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडचं नाही. पण एककाळ असा होता तेव्हा सलमान खानला देखील लग्न करायचे होते. लग्नापासून लांब पळणाऱ्या सलमाननं देखील संसार थाटायचं स्वप्न पाहयलं होतं. पण माशी कुठं शिंकली…असा प्रश्न पडतो. याचाच एक किस्सा आपण जाणून घेणार आहे. सलमान खान आणि दिग्दर्शक साजिद नाडियावाला (Sajid Nadiadwala) यांची मैत्री जगजाहीर आहे. अनेक कार्यक्रमात हे दोघे हाताहात घालून फिरताना दिसते. साजिद नाडियावालाने सलामानचे अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलं आहे. या दोघांची मैत्री इतकी घट्ट आहे की, दोघांनी एकाच मंडपात लग्न करायचं ठरवलं होतं. साजिदनं एकदा ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये याचा खुलासा देखील केला होता. पहिल्यांदा आम्ही दोघांनी लग्न न करण्याचा विचार केला होता, असं साजिदनं या शोमध्ये सांगितलं होतं. वाचा- बॉलिवूड-हॉलिवूड नाव कसं पडलं? यामध्ये का वापरला जातो ‘वूड’? पण एकेदिवशी सलमान खानचं मन बदललं. तेव्हा सलमान साजिदकडं आला आणि म्हणाला आपण आता लग्न करूया.. साजिद पुढे म्हणाला की, सलमान खानकडं लग्न करण्यासाठी मुलगी तयार होती पण मला तर लग्नासाठी मुलगी शोधावी लागणार होती. मी सलमानचं मनावर घेत लग्नासाठी मुलगी शोधली, लग्नाची सगळी तयारी देखील झाली. लग्नपत्रिका देखील छापल्या होत्या. सगळं काही तयार होतं. सलमान साजिदला दिला होता पळून जाण्याचा सल्ला लग्नाची सगळी तयारी झाली होती. पण त्यानंतर जे झालं त्याची कल्पना साजिदने देखील केली नव्हती. खरं तर लग्नाच्या काही दिवस आधी सलमान खानने आपला विचार बदलला आणि त्याने लग्न करण्यापासून माघार घेतली. साजिदने किपलच्या शोमध्ये सांगितले होते की, सलमान खानने आधीच त्याचे लग्न मोडले होते. परंतु जेव्हा तो माझ्या लग्नात आला तेव्हा तो स्टेजवर आला आणि मला म्हणाला, बाहेर गाडी उभी आहे पळून जायचे असेल तर जा हीच वेळ आहे.

दिव्या भारतीसोबत केले होते पहिले लग्न साजिद नाडियाडवालाने 2000 मध्ये पत्रकार वरदा खानसोबत लग्न केले. यापूर्वी त्याने अभिनेत्री दिव्या भारतीसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या वर्षभरानंतर या अभिनेत्रीचे निधन झाले. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या