मुंबई, 24 सप्टेंबर : रिअलिटी शो ‘Bigg Boss 13’ मागच्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. यावेळी या सीझनमध्ये अनेक बदल करण्यात आले. तसेच सलमान खानच्या मानधनाची सुद्धा प्रचंड चर्चा झाली. हा सीझन येत्या 29 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. नुकताच या सीझनचा लॉन्चिंग इव्हेंट पार पडला. मात्र दरवेळी सुपरकूल राहणारा सलमान खान या इव्हेंटमध्ये मात्र पत्रकारावर भडकलेला दिसला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खान सोमवारी (23 सप्टेंबर) बिग बॉसच्या लॉन्चिंग सोहळ्याला पोहोचला होता. यावेळी ठिकणी बरीच गर्दी होती. अनेक फोटोग्राफर सतत सलमानचे फोटो काढताना दिसत होते. ज्यामुळे सलमानच्या कामात अडथळा येत होता. अनेकदा सांगूनही एक फोटोग्राफर सलमानचा रस्ता ब्लॉक करून त्याचे फोटो काढत होता. ज्यामुळे सलमानचा राग अनावर झाला आणि तो त्या फोटोग्राफरवर भडकला. Sacred Games च्या अभिनेत्रीने सांगितला ‘कास्टिंग काउच’चा धक्कादायक अनुभव
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान, माझ्यामुळे यांना प्रॉब्लेम होत आहे तर मग यांनी मला बॅन करायला हवं असं बोलताना दिसत आहे. त्यानंतर तो मागे जातो मात्र त्याच्या चेहऱ्यावरील रागाचे भाव स्पष्ट दिसत आहेत. मात्र एवढं होऊनही अनेकजण पुन्हा फोटो काढताना दिसत आहेत. पतीसाठी ओक्साबोक्शी रडली राखी सावंत; म्हणाली तुम्हाला माझी जराशीही दया येत नाही? हे प्रकरणात काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र सलमानचा राग शांत होत नव्हता. त्यानंतर सर्वजण असंच करत राहिलात तर आम्ही हा कार्यक्रम पुढे नेऊ शकणार नाही. कार्यक्रम संपल्यावर सर्वांनाच फोटो काढण्याची संधी मिळणार आहे असं पी आर एजंट सांगताना दिसतात. तर मागून सलमान पुन्हा एकदा फोटो काढत असलेल्या फोटोग्राफर्सना काढा तुम्ही फोटो काढा असं बोलताना दिसत आहे. त्यानंतर सर्वजण फोटो काढायचं थांबवून बाकी लोकांना फोटो काढू देतात.
बिग बॉस 13 लॉन्च इव्हेंटमध्ये सलमान खान मुंबई मेट्रोनं पोहोचला होता. यावेळी त्यानं ढोलाच्या तालावर डान्स केला. त्यामुळे कार्यक्रमाचा सुरुवात धमाकेदार झाली. आता येणारा सीझन कसा असेल याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. बिग बॉस 13च्या स्पर्धकांबद्दल बोलायचं तर या सीझनमध्ये चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, टीवी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, राकेश वशिष्ठ, माहिका शर्मा, डैनी डी, जीत, खासदार चिराग पासवान, बॉक्सर विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, मेघना मलिक, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी, फैजी बू, सोनल चौहान, सिद्धार्थ शुक्ला यांची नावं समोर आली आहेत. याशिवाय राखी सावंत आणि दीपक कल्लाल यांच्या नावांचीही चर्चा आहे. Saand Ki Aankh: तीन चार की जिंदगी बनान खातर एककी जान लेनी पड़े तो कोई हरज ना है ======================================================================= स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO