JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पुन्हा व्हायरल झाला Sonakshi Sinha-Salman Khan च्या लग्नाचा नवा फोटो, वरुण धवनशी आहे कनेक्शन

पुन्हा व्हायरल झाला Sonakshi Sinha-Salman Khan च्या लग्नाचा नवा फोटो, वरुण धवनशी आहे कनेक्शन

या दोन्ही कलाकारांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या देखील फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान वधू-वराच्या वेशात दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 मार्च: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha and Salman Khan photo) यांचा एक फोटोशॉप केलेला फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वधूवरांच्या आउटफिटमध्ये हा फोटो एडिट करण्यात आला होता, त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने तिचा रागही व्यक्त केला होता. दरम्यान या सगळ्या प्रकारादरम्यान या दोन्ही कलाकारांचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या देखील फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान वधू-वराच्या वेशात दिसत आहेत. या फोटोमुळे पुन्हा चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र हा फोटो देखील पहिल्या फोटोसारखा खोटा आहे. या देखील फोटोमध्ये दोघांचे चेहरे एडिट करून वापरण्यात आले आहेत. पाहा नेमका काय आहे हा फोटो-

या फोटोशी आहे वरुण धवनचे कनेक्शन तुम्ही जर निरखून पाहिले तर लक्षात येईल या फोटोशी वरुण धवनचे काय कनेक्शन आहे. या फोटोतील आउटफिट वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी त्यांच्या लग्नात परिधान केले होते. सलमान-सोनाक्षीच्या एडिट केलेल्या फोटोमध्ये देखील नताशा-वरुणच्या लग्नातील एक फोटो वापरण्यात आला आहे.

सोनाक्षी-सलमानने एकत्र केले आहेत तीन चित्रपट सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा या दोघांनी तीन चित्रपट एकत्र केले आहे. सोनाक्षीने सलमानच्या दबंग सिनेमातूनच बॉलिवूड डेब्यू केला होता. या दोघांची जोडी चाहत्यांना दबंग मुव्ही सीरिजमध्ये विशेष आवडली होती, त्यामुळेच कदाचित या दोघांचे असे फोटो एडिट केले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या