JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ब्रेकअप होताच सलमानची अभिनेत्री पडली एकटी, दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये आला दुरावा

ब्रेकअप होताच सलमानची अभिनेत्री पडली एकटी, दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये आला दुरावा

अवीने त्याच्या कामाला नात्याहून जास्त प्राधान्य देण्यास सुरुवात केली होती. इतंकच नव्हे, तर या दोघांत कोणा एका तिसऱ्या व्यक्तीमुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, १४ जून- एकीकडे सेलिब्रिटींच्या नात्यामध्ये आनंददायी वळणं येण्याच्या चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र काही सेलिब्रिटींच्या नात्यात वादळ आल्याचं स्पष्ट होत आहे. ऐश्वर्या राय प्रमाणेच दिसणारी आणि सलमान खानसोबत ‘लकी’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री स्नेहा उल्लालच्या आयुष्यातही काहीसं असंच वादळ आलं आहे. ऑल इंडिया मिक्स्ड मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अवी मित्तल ती नात्यात होती असं म्हटलं जात होतं. स्नेहाने या नात्याचा कधीही स्वीकार केला नसला तरीही हे उघड सत्य होतं. पण आता स्नेहा आणि अवी यांच्यात दुरावा आला असून दोघांचे मार्ग वेगळे झाल्याचं म्हटलं जात आहे. हेही वाचा-  आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’ स्पॉटबॉयईने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या दोघांमध्ये आता कोणत्याही प्रकारचा संपर्क नसल्याचं म्हटलं जात आहे. व्हॅलेंटाइन डेनंतर मार्च महिन्यातच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती समोर आली. अवी आणि स्नेहाकडून या ब्रेकअपविषयी काहीच स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवीने त्याच्या कामाला नात्याहून जास्त प्राधान्य देण्यास सुरुवात केली होती. इतंकच नव्हे, तर या दोघांत कोणा एका तिसऱ्या व्यक्तीमुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- बॉलिवूडचे 4 सेलिब्रिटी जे एकटेच सांभाळतायेत आई- बापाची जबाबदारी स्नेहा आणि अवी बऱ्याच काळापासून एकमेकांचे फार चांगले मित्र होते. पुढे जाऊन त्यांचं हे मैत्रीचं नातं प्रेमात रुपांतरीत झालं. दोघांच्याही कुटुंबीयांना या नात्याविषयी माहिती होती. स्नेहा नेहमीच अवीच्या कौटुंबिक समारंभांनाही हजेरी लावत असे. पण, आता मात्र त्यांच्या नात्यात आलेलं हे वादळ पाहता परिस्थितीला वेगळंच वळण मिळालं असून सारंच चित्र बदललं आहे हे खरं. दरम्यान स्नेहा उलालला काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला अनेक दिवसांपासून ताप आला होता. हा ताप कमी न होता वाढतच जात होता, त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त आराम करण्याच सल्ला दिला आहे. स्वतः स्नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली होती. स्नेहाने स्वतःचे रुग्णालयातील दोन फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. हेही वाचा-  बिग बींची अनेक महिन्यांची ‘ती’ इच्छा अखेर झाली पूर्ण VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या