मुंबई, 21 फेब्रुवारी- आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. बोर्ड परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. तर दहावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये तसंच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. परीक्षेच्या पेपरची अनेकांना भीती असते. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दडपण येत असतं. अशावेळी त्यांचे दडपण कमी करता आलं पाहिजे. यासाठी अनेकजण त्यांना विविध टिप्स देत असतात. तसेच पेपर चांगाल जावा म्हणून अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज बारावीच्या मुलांना शुभेच्छा देत आहेत. त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील बारावीच्या व दहावीच्या मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत व एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुंभकर देखील बारावीला आहे. त्याला परीक्षेला सोडून आल्यानंतर परीक्षा हॉलच्या बाहेरचे वातावरण पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी यांनी व्हिडिओ पोस्ट करत बारावीच्या आणि दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- कोरोना काळात मदतीसाठी पैसा कुठून आला? सोनू सूदने दिलं उत्तर सलील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, अभ्यास करा ..कष्ट करा..पण दडपण घेऊ नका.. प्रत्येक फुलाची आणि प्रत्येक मुलाची उमलयाची वेळ वेगवेगळी असते एवढं लक्षात ठेवा.. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या जीवापेक्षा काहीच महत्तेवाचं नाही असं देखील महत्त्वाचा सल्ला त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मुलांना दिला आहे.
गायक,संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.त्यांच्या विविध कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतात. त्यांची अनेक गाणी ही लहान मुलांना आवडतात. लहान मुलांच्यात त्यांची चांगलीच क्रेझ आहे. सलील कुलकर्णी यांनी पालक, डॉक्टर या नात्याने मुलांना कसलही परीक्षेचे दडपण घेऊ नका असा सल्ला दिला आहे
परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्याची पूर्ण तयारी परीक्षा विभागाने केली आहे. कॉपी टाळण्यासाठी भरारी पथके, बैठे पथक असणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.