मुंबई, 13 एप्रिल- ‘दिल दोस्ती दुनियादारी**’ (Dil Dosti Duniyadari)** या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मराठमोळी जोडी सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि सखी गोखले (Sakhi Gokhale) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सखीनं नुकतीच सुव्रतसाठी एक रोमॅंटिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिण्यामागे देखील खास कारण आहे. नुकताच सखी आणि सुव्रतचा लग्नाचा वाढदिवस झाला. या दोघांच्या लग्नाला 11 एप्रिलला तीन वर्ष झाले यानिमित्त सखीनं सुव्रतसोबत (Sakhi Gokhale Suvrat Joshi marriage anniversary) एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे सखीनं इन्स्टावर सुव्रतसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मर्जियाँ, तुम्हारी हो..खुश रहूँ मैं तेरी मनमानी में “ ✨ सात वर्षे झाली या फोटोला आणि तीन वर्षे झाली आपल्या लग्नाला… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साथी ! ♥️.तिच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलेब्सकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- ‘त्यांच्या असण्याचाही आधार..’ कुशल बद्रिकेची आपल्या माणसांसाठी भावुक पोस्ट सखी आणि सुव्रत यांनी ११ एप्रिल २०१९ रोजी लग्नगाठ बांधली होती. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. घरच्यांच्या परवानगीने ते लग्नबंधनात अडकले. अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. मुंबई जवळच्या सगुणाबाग मध्ये त्यांचा विवाह पार पडला. जवळचे मित्र आणि नातेवाईक अश्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला, त्यानंतर मुंबईत मोठ्या दिमाखात रिसेप्शन पार पडला. सध्या दोघंही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने लंडनमध्येच आहेत.
सखी आणि सुव्रत यांची अशी आहे प्यारवाली लव्हस्टोरी सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट (Sakhi Gokhale Suvrat Joshi Love story) दुनियादारी या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्याआधी ते एकमेकांना फेसबुकवरून ओळखत होते. परंतु मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांची खुप चांगली मैत्री झाली. पुढे अमर फोटो स्टुडियो या नाटकात त्यांनी एकत्र काम केलं. अन् या नाटकादरम्यानच दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सखी शिक्षणासाठी लंडनला गेली. याच दरम्यान दोघांमध्ये रिलेशनशिप असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु दोघांनीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. अनेकदा दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसाबोत रोमॅंटिक फोटो असतील किंवा व्हिडिओ शेअर करत असतात.