JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नागराज आण्णांच्या डुप्लिकेटचा सैराट अंदाज पाहिलात का? मंजुळेही करू शकणार नाही स्वत:ची अशी ॲक्टिंग

नागराज आण्णांच्या डुप्लिकेटचा सैराट अंदाज पाहिलात का? मंजुळेही करू शकणार नाही स्वत:ची अशी ॲक्टिंग

सोशल मीडियावर नागराज मंजुळेंनी डुप्लिकेट देखील पाहायला मिळतोय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

जाहिरात

nagraj manjule duplicate

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल : सैराट सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आणले असं म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शक नागराज मंजुळेंना सैराटमुळे नाव मिळालं. फँड्री, सैराट,झुंड सारखे एकाहून एक दमदार सिनेमांनी नागराज मंजळेंनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता घर बंदूक बिरयानी सारखी कलाकृती ते प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.  दिग्दर्शनाबरोबरच अभिनयात देखील पारंगत असलेल्या नागराज मंजुळे यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.  याच प्रसिद्धीनं नागराज मंजुळेंचा नागराज आण्णा कधी झाला हे कोणाला कळलंच नाही. दरम्यान सोशल मीडियावर नागराज मंजुळेंनी डुप्लिकेट देखील पाहायला मिळतोय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

फँड्रीच्या वेळचे नागराज मंजुळे आणि झुंड नंतरचे नागराज मंजुळे यांच्यात खूप फरक झाला आहे. त्यांच्या लुकमध्ये ड्रेसिंग स्टाइलमध्ये देखील मोठा बदल पाहायला मिळतोय. विशेष करून त्यांच्या केसांची स्टाइल आणि दाढी ही तरूण वर्गाला आकर्षित करताना दिसत आहे. अर्धे सफेद केस आणि काळे केस, चश्मा, शॉर्ट सदरा टाइप शर्ट आणि जीन्स असा लुक सध्या नागराज मंजुळेंचा पाहायला मिळतोय.  नागराज मंजुळे यांची बोलण्याची देखील वेगळी स्टाइल पाहायला मिळते. त्यांच्या बोलण्यात खेडे गावातील एक स्टाइल आहे. शहराकडच्या लोकांना बऱ्याचदा त्यांचं बोलणं एक फटक्यात समजत नाही. पण नागराज मंजुळेंनी सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हेही वाचा - Gautami Patil : गौतमीचा फिल्मी अंदाज! स्टेजवरून उतरून घेतले आशीर्वाद, चंद्रावर भन्नाट नाचली… नागराज मंजुळे यांची हिच स्टाइल आणि बोलण्याची पद्धत अगदी डिट्टो कॉपी करून एका डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटरनं एक धम्माल व्हिडीओ बनवला आहे. या आधीही चला हवा येऊ द्या सारख्या कार्यक्रमात निलेश साबळेला नागराज मंजुळेंची ॲक्टिंग करताना पाहिलं आहे. पण योगेश तवार या कॉन्टेंट क्रिएटरनं नागराजची केलेली अँक्टिंग सर्वांपेक्षा वेगळी ठरत आहे. हा अवलिया नागराजच्याच सिनेमाची रेसिपी करून दाखवतोय.  योगेशच्या या व्हिडीओ 33.4 k हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नागराज मंजुळे यांची सतत डोळ्याला हात लावण्याची स्टाइल असो किंवा सतत शर्टाची कॉलर तपासणं असो, योगेशनं या बारिक सारिक गोष्टी फार उत्तमरित्या जमवल्यात. त्याने हुबेहूब नागराज मंजुळेंचा आवाज काढण्याचा देखील प्रयत्न केलाय.

संबंधित बातम्या

योगेश तवार या डिजिटल कॉन्टेंट क्रिएटरच्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका युझरनं म्हटलंय, “नागराज मंजुळे पण असे नागराज मंजुळे नाही करू शकणार अशी acting super”. दुसऱ्या युझरनं म्हटलंय,  “लवकरच भाऊची मराठी फिल्म चित्रपटात एंट्री होणार असं मला वाटतंय”. तर आणखी एका युझरनं लिहिलंय, “क्या बात है भाऊ काहीच फरक नाही सेम अण्णा अण्णांला बघून पण हेवा वाटेल एक नंबर”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या