JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सैफ अली खानचा मुलगा पतौडींचा 'वारस', VIDEO VIRAL

सैफ अली खानचा मुलगा पतौडींचा 'वारस', VIDEO VIRAL

बॉलिवूडच्या लेकप्रिय स्टार कीड्सपैकी एक असलेला सैफच्या मुलाचे काही फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान हा लाइम लाइटपासून दूर असतो. मात्र सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टार कीड्सपैकी एक असलेला इब्राहिमचे काही फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आले आहेत. यामागचे कारण म्हणजे इब्राहिमने वडील सैफ अली खान किंवा आई अमृता यांच्याप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीची वाट न धरता आजोबा मन्सूर अली खान पतौडी यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. इब्राहिम अली खानचे क्रिकेट खेळत असलेले व्हिडिओ व्हायरल होत आहेत. इब्राहिम अली खानचे क्रिकेट किटसह फोटो सोशल मीडियावर आहेत. तसेच नेटमध्ये प्रॅक्टिस करत असलेला व्हिडिओसुद्धा आहे. भारताचे माजी कर्णधार आणि पतौडीचे नवाब मन्सूर अली खान यांच्याप्रमाणेच इब्राहिमलासुद्धा क्रिकेटची आवड आहे. अनेकदा क्रिकेटचा सराव करून बाहेर पडताना चाहते त्याच्यासोबत फोटो काढून घेत असतात. कशी गेली जेलमधील पहिली रात्र, पायल रोहितगीनं शेअर केला अनुभव

काही दिवसांपूर्वी सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने तिची सासू शर्मिला टागोर यांना प्रश्न विचारला होता की, सारा, इब्राहिम आणि तैमूर यांच्यातील त्यांचं आवडतं नातवंड कोण आहे. त्यावर शर्मिला टागोर यांनी म्हटलं की, सगळेच एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. इब्राहिम खरा पतौडी वाटतो असं सांगतानाच त्याला क्रिेकेट खूप आवडतं आणि त्याची उंचीही चांगली आहे असं म्हटलं होतं. अमिताभ बच्चन यांनी केलं ट्वीट, ‘माझा मुलगा माझा वारस नाही…’ डॉ श्रीराम लागू म्हणाले होते, ‘मी कधीच न केलेली गोष्ट माझ्याकडून त्यावेळी घडली’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या