JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'एक नदी पाहिजे...' अभिनेत्री सई ताम्हणकरने अशी नेमकी काय केली मागणी?

'एक नदी पाहिजे...' अभिनेत्री सई ताम्हणकरने अशी नेमकी काय केली मागणी?

अभिनेत्री सई ताम्हणकरने आता एका नदीशेजारचा फोटो शेअर केल आहे. तिने या पोस्टमध्ये दिलेल्या हॅशटॅगनुसार हा फोटो ‘भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात भाडिपाच्या अपकमिंग सीरिजच्या (Bhartiya Digital Party BhaDiPa) शूटिंग दरम्यानचा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल: अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar News) हे बॉलिवूड आणि मराठी सिने इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मोठ्या पडद्यावर जशी सई तिच्या अभिनयाने चाहत्यांना पसंतीस पडते, तसेच सईचे सोशल मीडिया देखील (Sai Tamhankar Instagram) चाहत्यांना आवडते. ती इन्स्टाग्रामवर विशेष सक्रिय आहे. फोटोशूट, प्रमोशन, भटकंती ते अगदी तिच्या प्रोजेक्ट्सच्या सेटवरील फोटो सई तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अभिनेत्री सई ताम्हणकरने आता एका नदीशेजारचा फोटो शेअर केल आहे. तिने या पोस्टमध्ये दिलेल्या हॅशटॅगनुसार हा फोटो ‘भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात भाडिपाच्या अपकमिंग सीरिजच्या (Bhartiya Digital Party BhaDiPa) शूटिंग दरम्यानचा आहे. काही दिवसांपूर्वी भाडिपाने (Bhadipa upcoming web series) या सीरिजचा टीजरही शेअर केला होता. सई ताम्हणकरने हा फोटो शेअर करताना अशी कॅप्शन दिली आहे की, ‘एक नदी पाहिजे आयुष्यात!’ यामध्ये ती तिच्या या प्रोजेक्टच्या संपूर्ण क्रू मेंबर्ससह दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने  ‘#berojgaar #bhadipa #comingsoon #wrap #beautifulmaharashtra #ichalkaranji #sarangsathaye’ असे काही हॅशटॅग्ज शेअर केले आहेत. त्यावरुन हा फोटो इचलकरंजी याठिकाणचा असून भाडिपाची जी ‘BERojgar’ नावाची वेबसीरिज लवकरच येणार आहे त्याचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतरचा आहे.

भाडिपा वेगवेगळ्या विषयांवर नेहमी वेबसीरिज घेऊन आलं आहे. तरुणांना आकर्षित करणारे विषय पण जवळपास सर्व वयोगटातील लोकं पाहू शकतील असा कंटेट भाडिपाने दिला आहे. हा कंटेट युजर्सच्या पसंतीसही आला आहे. त्यामुळे आता ही सई ताम्हणकरची (Sai Tamhankar in BERojgar Bhadipa web series) वेब सीरिज कशी असणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. सारंग साठ्ये याने देखील हा फोटो पोस्ट केला आहे. त्याने यावेळी म्हटले आहे की, ‘Its A Wrap! जवळपास अशक्य काम एका महिन्यात पूर्ण करणारे अत्यंत कष्टाळू असे क्रू मेंबर्स यामध्ये होते. केवळ शूटिंगचा एकच छोटासा दिवस बाकी आहे. या हंगामातील यूट्युबवरील सर्वात मोठी मराठी सीरिज अनुभवण्यासाठी सज्ज राहा! टीम इचलकरंजी आणि टीम शिवनाकवाडी तुम्ही बेस्ट आहात.’

या सीरिजमध्ये सई ताम्हणकर हिच्यासह काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. जगदीश कन्नम आणि संभाजी ससाणे हे कलाकार या सीरिजमध्ये दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या