सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक
मुंबई, 03 जून : मराठमोळ्या अभिनेत्री देखील आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपलं नाव मोठं करताना दिसत आहेत. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाहून एक जबरदस्त क्राइम थ्रिलर वेब सीरिज येत आहेत. ‘सिटी ऑफ ड्रिम’चा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात मोठी मराठी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. सिटी ऑफ ड्रिमच्या पहिल्या सीझनमध्ये मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटचा लेस्बियन किसिंग सीन चांगलाच चर्चेत आला होता. आता केवळ प्रियाच नाही तर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील लेस्बियन किसिंग सीन दिला आहे. सईची नवी वेब सीरिजच लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘क्राइम बीट’ असं सईच्या नव्या वेब सीरिजचं नाव आहे. यात सईबरोबर अभिनेता साबीक सलीम, राहूल भट्टस, आदिनाथ कोठारे, सबा आझाद, किशोर कदम हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वेब सीरिजचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सईचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतं आहे. क्राइम थ्रिलर असलेल्या या वेब सीरिजमध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत असून त्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय. वेब सीरिजच्या टीझरला काही तासाच चांगला प्रतिसाद मिळाला असून चाहत्यांनी वेब सीरिज पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. हेही वाचा - अमेरिकेत फिरतेय मराठमोळ्या अभिनेत्याची बायको; दिसायला देखणी, स्टायलिश; अभिनेत्रींना देतेय टक्कर 1 मिनिटं 20 सेकंदाच्या टीझरमघ्ये अभिनेता साकिब सलीम एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसतोय. ज्याच्याभोवती गोष्ट फिरताना दिसतेय. वेब सीरिजचा टीझर चांगलाच रोमांचक असून भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांमधील संबंधांवर भाष्य करणाऱ्या या सीरिजमधून प्रेक्षकांना नवा कंटेन्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेता ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद हिची देखील लहान भूमिका यात पाहायला मिळतेय. किशोर कदम, सई ताम्हणकर आणि आदिनाथ कोठारे ही तगडी मराठी स्टारकास्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
वेब सीरिजच्या टीझरमध्ये सई ताम्हणकरचा बोल्ड लुक पाहायला मिळत आहे. स्विमिंग पूलमध्ये सईचा लेस्बियन लिपलॉक पाहायला मिळतोय. सीरिजमध्ये सईची भूमिका नेहमी काय असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. क्राइम बीटच्या निमित्तानं पुन्हा एकदा सईचा बोल्ड लुक पाहायला मिळणार आहे. क्राइम बीट ही वेब सीरिज झी 5 वर रिलीज होणार आहे. रिलीज डेट लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक पाहून स्वत: प्रिया बापटने “ब्रिंग इट ऑन सई” अशी कमेंट करत तिचं कौतुक केलंय. अभिनेत्री क्रांती रेडकर, अमृता खानविलकर यांनाही फायर इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केलंय.