मुंबई, 30 जून- सुपरस्टार शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीत २७ वर्ष पूर्ण केले. यानिमित्ताने शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यानंतर क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने किंग खानची बाइक चालवण्यावरून सल्ला दिला. शाहरुखने २५ जूनला एक पोस्ट केली होती. या पोस्टवर सचिनने शनिवारी उत्तर देत म्हटलं की, ‘प्रिय बाजीगर, डोंट ‘चक’ दे हेल्मेट. ‘जब तक है जान’ तोवर बाइकवर याचा उपयोग कर. २७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. लवकरच भेटू.’
भारत- इंग्लंड सामन्यात ऋषी कपूर यांनी केले मजेशीर ट्वीट, पाकिस्तानी चाहते भडकले
शाहरुखनेही सचिनच्या या ट्वीटला उत्तर देत म्हटलं की, ‘माझ्या मित्रा, हेल्मेट वापरून ऑन ड्राइव्ह.. ऑफ ड्राइव्ह आणि स्ट्रेट ड्राइव्ह करणं तुझ्यापेक्षा चांगलं कोण शिकवू शकतं. मी माझ्या नातवंडांना सांगेन की मला ‘ड्रायविंग’ स्वतः महान सचिनने शिकवली आहे. फिश करी खायला लवकरच आपण भेटू. धन्यवाद.’ 
जर टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप, तर विराटला बॉलिवूडकडून मिळेल सर्वात मोठी भेट
या व्हिडिओमध्ये शाहरुखने आपल्या ‘दिवाना’ या पहिल्या सिनेमात ज्याप्रमाणे एण्ट्री घेतली होती तोच सीन रीक्रिएट केला. शाहरुख म्हणाला की, ‘हा एक योगायोग आहे की एका मोटरसायकल कंपनीच्या मित्रांने २७ वर्षांपूर्वी ‘दिवाना’ सिनेमात केलेले स्टंट पुन्हा करण्यासाठी मला दोन मोटरसायकल दिल्या. मी पुन्हा एकदा ते स्टंट करायला जात आहे. पण यावेळी ते थोडे वेगळे असतील. मी यावेळी नक्कीच हेल्मेट वापरेन. बाइक चालवताना नेहमीच हेल्मेट वापरा.’
सलमान खानने तहानलेल्या माकडाला पाजलं पाणी, VIDEO VIRAL
VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा