JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शौर्य आणि पराक्रमाचं समानार्थी नाव...' मुंबईच्या 'या' रिअल कॉपवर Rohit Shetty बनवणार सिनेमा

'शौर्य आणि पराक्रमाचं समानार्थी नाव...' मुंबईच्या 'या' रिअल कॉपवर Rohit Shetty बनवणार सिनेमा

रोहित शेट्टी आता पहिल्यांदाच एका खऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे. रोहित शेट्टी लवकरच राकेश मारिया (Rakesh Maria) यांच्यावर बायोपिक बनवणार आहे. नुकतंच त्याने याची घोषणा केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल-   बॉलिवूडमधील  (Bollywood)  एक प्रसिद्ध दिग्दर्शित म्हणून रोहित शेट्टीला (Rohit Shetty)  ओळखलं जातं. रोहितने अनेक दमदार चित्रपट देत बी टाऊनमध्ये आपला एक दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी प्रामुख्याने पोलिसांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे. हे सर्व चित्रपट काल्पनिक कथेवर आधारित होते. परंतु रोहित शेट्टी आता पहिल्यांदाच एका खऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे. रोहित शेट्टी लवकरच राकेश मारिया  (Rakesh Maria)  यांच्यावर बायोपिक बनवणार आहे. नुकतंच त्याने याची घोषणा केली आहे. रोहित शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत विविध पोस्ट शेअर करत आपल्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. दरम्यान रोहितने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सोबतच आपला आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये रोहित शेट्टी राकेश मारिया यांच्यासोबत दिसून येत आहे.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. रोहित शेट्टी पोस्ट- रोहित शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिलं आहे, ‘93 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाची उकल करण्यापासून ते 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबई अंडरवर्ल्डला निर्भयपणे तोंड देणे ते एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची चौकशी करणे आणि 26/11 च्या हल्ल्यादरम्यान आपल्या शहरासाठी खंबीरपणे उभे राहणे…राकेश मारिया हे शौर्य आणि पराक्रमाचे समानार्थी नाव आहे!या खऱ्या आयुष्यातील सुपरकॉपचा प्रवास पडद्यावर आणताना अभिमान वाटत आहे’!!!

संबंधित बातम्या

कोण आहेत राकेश मारिया?- राकेश मारिया हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर आहेत. राकेश मारिया यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कठीण आणि मोठी प्रकरणे हाताळली आहेत. 1993 मध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट, गेटवे ऑफ इंडिया ते जवेरी बाजार बॉम्बस्फोट, त्यांनतर 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाबची चौकशीसुद्धा राकेश मारिया यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या