JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: 'बास ग जुया किती हौस तुला'; जुईली जोगळेकरच्या नव्या टॅटूवर नेटकऱ्यांच्या हटके कमेंट

VIDEO: 'बास ग जुया किती हौस तुला'; जुईली जोगळेकरच्या नव्या टॅटूवर नेटकऱ्यांच्या हटके कमेंट

गायिका जुईली जोगळेकर (Juilee joglekar tattoo) तिच्या गाण्याविषयी प्रचंड पॅशिनेट आहे. पण त्याचप्रमाणे जुईली टॅटू काढण्याची देखील प्रचंड आवड आहे. नुकतेच तिने 2 नवे टॅटू काढले आहेत.

जाहिरात

VIDEO: 'बास ग जुया किती हौस तुला'; जुईली जोगळेकरच्या नव्या टॅटूवर नेटकऱ्यांच्या हटके कमेंट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,23 मे: मराठीमोठी गायिका जुईली जोगळेकर (singer Juilee joglekar)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. काही महिन्यांपूर्वीच ती गायक रोहीत राऊतसोबत (Rohit Raut) लग्नबंधनात अडकली. जुईली तिच्या गाण्याविषयी प्रचंड पॅशिनेट आहे. पण त्याचप्रमाणे जुईली टॅटू काढण्याची देखील प्रचंड आवड आहे.  जुईलीच्या हातावर अनेक आजवर तिने अनेक टॅटू काढले आहेत. तिचं टॅटूविषयी असलेलं प्रेम आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. जुईलीने पुन्हा एकदा आल्या हातावर नवा टॅटू काढला आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर टॅटू काढतानाचा व्हिडीओ शेअर  केला आहे.  तिच्या नव्या टॅटूला चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. तर काहींनी तिच्या व्हिडीओवर हटके कमेंट्स केल्या आहेत. जुईलीने तिच्या हातावर एकूण 2 नवे टॅटू काढले आहेत. दोन्ही टॅटू इंक (Ink Tatto) टॅटू आहेत. जुईलीने तिच्या डाव्या हातावर ‘FLOW’ असा टॅटू काढला आहे. तर त्याच हाताच्या अंगठ्यावर इंक हार्ट देखील आहे. जुईलीने शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये तिने तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर 3 अॅरो काढले आहेत.  सांगायचं झालं तर जुईलीच्या हातावर आधीपासूनच ‘राज्ञी’  असं लिहिलेला मोठा टॅटू आहे. ‘वन मोर’, असं म्हणतं जुईलीने तिच्या टॅटूचा व्हिडीओ शेअर केला आहे.

जुईलीच्या व्हिडीओवर कमेंट करत युझर्सनी प्रश्न विचारलाय की, ‘रोहीतला हे पटतं का?’  यावर उत्तर देत एका युझरने म्हणलंय, ‘तिला रोहितलला पटवावं लागेल’. तर बाकीच्या युझर्सनी कमेंट करत कौतुक केलेय, ‘बास ग जुया किती हौस तुला’. तर काहींनी ‘मला तुझा राज्ञी हा टॅटू खुप आवडला’, असं म्हटलं आहे.

बऱ्याच जणांनी जुईलीच्या टॅटूचं कौतुक केलंय. तर काहींनी तिला ‘कशाला एवढा टॅटू’ असं म्हटलंय, ‘अगं इतका सिंपल टॅटू काढायचा होता तर CD मार्केटने पण काढता आला असता उगाच एवढी दुखापत कशाला’, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या